ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जर पालकांनी मुलांसोबत वेळ घालवला आणि त्यांना दररोज प्रश्न विचारले तर त्यांचा मानसिक आणि शारीरिक विकास जलद होतो.
मुलांना दररोज त्यांच्या दिवसाबद्दल, त्यांनी आज काय केले आणि त्यांना कोणत्या गोष्टी करायला आवडल्या याबद्दल विचारा.
त्यांना त्यांच्या भावना कशा व्यक्त करायच्या याची जाणीव करून द्या.
मुलांना प्रत्येक गोष्टींबद्दल सकारात्मक ठेवा, त्यांना सकारात्मक गोष्टी सांगा.
तुमच्या मुलांना प्रेमाची जाणीव करुन द्या की तुमचे पालक त्यांच्यावर किती प्रेम करतात आणि त्यांची काळजी घेतात.
मुलांना त्यांच्या चुकांबद्दल आणि त्या कशा सुधारता येतील याबद्दल त्यांना प्रेमाने समजावून सांगा.
जेव्हा जेव्हा ते काहीतरी चांगले आणि नवीन करतात तेव्हा त्यांना प्रोत्साहन द्या जेणेकरुन त्यांना चांगले वाटेल.