Pahalgam Attack: वर्षभरापूर्वी पर्यटकांच्या हत्या; पहलगामची परिस्थिती सध्या कशी आहे?

Kashmir Tourism Latest Update: 22 एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये हल्ला झाला होता. या घटनेला आता १ वर्ष पूर्ण होईल. याचा फटका अजूनही तिथल्या पर्यटकांना बसत आहे.
Pahalgam Attack
Kashmir tourism latest newsgoogle
Published on
Tourist safety Kashmir
Tourist safety Kashmirgoogle

22 एप्रिल दरम्यान घडलेला पहलगामचा हल्ला आजही आठवला की डोळ्यात अश्रू येतात. फिरण्यासाठी प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण आता शांत झालंय.

Tourist safety Kashmir
Tourist safety Kashmirgoogle

पहलगाम हे फिरण्यासाठी सगळ्यात सुंदर आणि हिरवाईने नटलेलं ठिकाण आहे. तिथे हिरवीगार लांबसडक मैदाने, मोठ-मोठ्या डोंगररांगा आणि झाडं पाहून सगळा थकवा, ताण नाहीसा होतो असं म्हणतात. पहलगाममधलं सगळ्यात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे बैसरन.

Kashmir tourism decline
Kashmir tourism declinegoogle

तिथेच मागच्या वर्षी २२ एप्रिल २०२५ मध्ये एक मोठा दहशतवादी हल्ला होता. या हल्ल्यात अनेक निष्पाप पर्यटकांना मारलं गेलं. त्यात कोणाचे वडील तर कोणाची मुलं होती. आता हेच सुंदर ठिकाण पर्यटकांच्या लिस्टमधून वेगळं जातंय असं चित्र समोर आलं आहे. सुरुवातीला इथे पर्यटकांना प्रवेशबंदी लागू केली होती. पण वर्षभरानंतर ही परिस्थिती सुधारेल अशी सगळ्यांना अपेक्षा होती.

Kashmir tourism decline
Kashmir tourism declinegoogle

दहशतवादी हल्ल्यानंतर बैसरन घाटी आणि जवळच्या परिसरात पूर्णपणे पर्यटनासाठी खुला करण्यात आलेला नाही. पण तिथल्या स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, जर हीच परिस्थिती सुरु राहिली, तर अनेकांना उपाशीच राहावं लागेल. तिथे व्यवसाय होत नाहीये. जे काही पर्यटक येतात ते फक्त १ ते २ दिवसांसाठीच येत असतात. यांच्या संख्येत ३० टक्के घट झाली आहे. तर सरकारकडून परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न सुरु आहे. तिथल्या सुरक्षा आणि बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com