

पुनर्वसू नक्षत्र -
गुरू ग्रह याच्या अंमलाखाली हे नक्षत्र येते.
अयोध्येचे राजा आणि हिंदू देवता भगवान राम यांचा जन्मही पुनर्वसु नक्षत्रात झाला होता. या व्यक्ती उंच शरीर, सडपातळ, रेखीव बांधा, हात पाय लांबट असतात, जीवनशक्ती थोडी कमी असते. पण बुद्धिमान, हुशार आणि प्रामाणिक असतात. हे नक्षत्र बिघडल्यास बडबडे, स्वप्नसृष्टीत रमणारे, कोणतेही काम अर्धवट ठेवतात. स्त्रिया मात्र विनायी,संसारी, कोमल, वात्सल्य गुणांनी परिपूर्ण असतात.
सुडौल बांधा, प्रमाणबद्ध शरीर असून बुद्धी आणि सौंदर्याचा मिलाफ दिसून येतो. नीटनेटकेपणा, स्वच्छतेची आवड असते. या व्यक्ती भावनाप्रधान असतात. मातृभक्त, देवभक्त असतात, श्रद्धावान असतात. संतोषी, संयमी, विचारी वृत्ती, साहित्य लेखन आवडते.
आत्मसंयमी व स्वाभिमानी, विचाराने व अनुभवाने समृद्ध असतात. सामाजिक कार्यामध्ये सफल होतात. सरकार दरबारी यांना मान मिळतो. यांच्यासाठी शिक्षणासाठी परिस्थिती उपयुक्त ठरते. एखादा मित्र असतो पण खास असतो. प्राण्यांशी संबंधित ही व्यक्ती असते.
रोग आजार -
या व्यक्तीला कंबरदुखी, डोके दुखणे, निमोनिया, अजीर्ण, मंदाग्नी,रक्तविकार, दमा, खोकला, टी.बी, भावनाप्रधान किंवा विचार व्यस्त असल्याने नैराश्य, चक्कर यापासून त्रास होतो.
नोकरी व्यवसाय -
या लोकांसाठी पत्रकारिता, शिक्षक, कथालेखक, ललित लेखक, नर्स, मठाधिकारी, जाहिरात, एजन्सी, नौदल, विमा एजंट, दुभाषी, अनुवादक, सचिव, रजिस्टार, पोस्टमन, ज्योतिषी, व्यापारी, विक्रेते, कमिशन एजंट, सेल्स टॅक्स, इन्कम टॅक्स, स्वतंत्र कामे करणारे, त्याचबरोबर उच्च अधिकारी, मुत्सदी, बागायती, शेतकरी लोक असू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.