Mahashivratri 2025: बेलपत्र फक्त महादेवाला प्रिय नाही, तर आरोग्यासाठीही आहे वरदान; जाणून घ्या 'हे' ४ फायदे

Health Tips Aurveda: महादेवाला वाहिले जाणारे बेलपत्र हे केवळ धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे नसून आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. आयुर्वेदानुसार, बेलपत्रामध्ये विविध औषधी गुणधर्म असून त्याचा शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो.
Health Tips Aurveda: बेलपत्र फक्त महादेवाला प्रिय नाही, तर आरोग्यासाठीही आहे वरदान; जाणून घ्या 'हे' ४ फायदे
Mahashivratri 2025SAAM TV
Published On

महादेवाला वाहिले जाणारे बेलपत्र हे केवळ धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे नसून आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. आयुर्वेदानुसार, बेलपत्रामध्ये विविध औषधी गुणधर्म असून त्याचा शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो. महाशिवरात्रीला महादेवाची पूजा करताना त्यांचे प्रिय पान म्हणजेच बेलपत्र अर्पण करतात. असे मानले जाते की, हे पान महादेवाला अर्पण केल्याने आपल्या मनोकामना लवकर पुर्ण होतात, आणि देव आपल्यावर प्रसन्न होतात. हे पान आता शरीरासाठी सुद्धा फायदेशीर ठरणार आहे. चला तर जाणून घेवू फायदे.

Health Tips Aurveda: बेलपत्र फक्त महादेवाला प्रिय नाही, तर आरोग्यासाठीही आहे वरदान; जाणून घ्या 'हे' ४ फायदे
Life Partner: ३० वर्षांचे झालात म्हणून लग्नाची घाई करताय? तरीही योग्य जोडीदार निवडण्यापुर्वी ‘या’ ५ चुका टाळा

बेलपत्राचे आरोग्यदायी फायदे:

जेवण पचन करण्यासाठी फायदेशीर

बेलपत्रामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असते, जे पचनसंस्थेसाठी फायदेशीर आहे. बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन यांसाठी उपयोगी आहे.

रक्तशुद्धीकरण आणि त्वचेसाठी उपयुक्त

बेलपत्राच्या सेवनामुळे रक्त शुद्ध होते आणि त्वचेवरील डाग, मुरूम कमी होतात. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.

हृदयासाठी फायदेशीर

बेलपत्र हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण संतुलित ठेवून हृदयविकाराचा धोका कमी करते.

मधुमेह नियंत्रणात मदत

बेलपत्राच्या रसाचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.

Health Tips Aurveda: बेलपत्र फक्त महादेवाला प्रिय नाही, तर आरोग्यासाठीही आहे वरदान; जाणून घ्या 'हे' ४ फायदे
Belly Fat Exercises: कंबरेचा घेर कमी होत नाहीये? व्यायाम आणि 'या' टीप्स वापरून घटवा बेली फॅट

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

बेलपत्रामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असल्यामुळे ते शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते. सर्दी, खोकला आणि संसर्गजन्य आजारांपासून बचाव करते.

मूत्रविकारांसाठी फायदेशीर

बेलपत्राचा रस लघवीशी संबंधित समस्या आणि मूत्राशयातील इन्फेक्शन दूर करण्यास मदत करतो.

कसा वापरावा?

बेलपत्राचा रस दररोज सकाळी पिऊ शकता.

बेलपत्राचा काढा बनवून तो सर्दी, खोकला किंवा पचनाच्या तक्रारींवर वापरू शकता.

वाळलेल्या बेलपत्राची पूड करून मधासोबत घेतल्यास अनेक फायदे होतात.

टीप: बेलपत्राचा जास्तीचा किंवा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्याचे सेवन करावे.

Health Tips Aurveda: बेलपत्र फक्त महादेवाला प्रिय नाही, तर आरोग्यासाठीही आहे वरदान; जाणून घ्या 'हे' ४ फायदे
Exam Tips For Parents: मुलांच्या परीक्षेमध्ये पालकांची भूमिकाही महत्त्वाची, कशी कराल मदत? 'या' चुका करणं टाळाच!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com