Life Partner: ३० वर्षांचे झालात म्हणून लग्नाची घाई करताय? तरीही योग्य जोडीदार निवडण्यापुर्वी ‘या’ ५ चुका टाळा

Relationship Tips: लग्न ही बाब प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाची महत्वाचीच असते. मात्र जर नात्यात समजुतदार व्यक्तीच नसेल तर आपले आयुष्य उध्दवस्त व्हायला वेळ लागत नाही.
right partner
relationship adviceai
Published On

लग्नाची व्याख्या प्रत्येक व्यक्तीसाठीसाठी वेगळीच असते. मुळात लग्न ही बाब प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाची महत्वाचीच असते. त्यात दोन वेगळे विचार, दोन वेगळी मनं, दोन वेगळे स्वभाव त्यांचे विचार जुळवून एक सुखाचा संसार सुरु करत असतात. मात्र जर नात्यात समजुतदार व्यक्तीच नसेल तर आपले आयुष्य उध्दवस्त व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे जोडीदार निवडताना विचारपुर्वक निर्णय घ्यायला हवा असं वारंवारं सागितलं जातं.

घरात जर तरुण व्यक्ती राहत असेल आणि तीचे वय तिशी कडे जात असेल तर घरातली मुख्य मंडळी त्यांच्या मागे लग्न करण्याचा हट्ट करायला सुरुवात करतात. पण कामाचा ताण, शिक्षण आणि आयुष्यात आलेले वाईट अनुभवांमुळे अनेकांना लग्नच करावेसे वाटत नाही. त्यात आपण घाईघाईत आपला जीवनसाथी निवडला तर पुढे जावून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यासाठी तुम्ही ३० वर्षाहुन जास्त वयाचे असाल तर पुढील महत्वाच्या ५ चुका करणे वेळीच टाळा.

१. वय वाढेतय म्हणून लग्न करणे.

लवकर लग्न कर नाहीतर, केस पांढरे होतील.. असे खोचक टोमणे वयाच्या ३० वर्षात हमखास ऐकू येतात. मात्र फक्त वयाच्या दबावाखाली लग्न करणं ही चुक असू शकते. लग्नाला कोणत्याही वयाचे बंधन नाही. तुम्हाला लग्न करायचं असेल तर तुमचा आनंद आणि सोयीनुसार करा. कोणाच्याही सामाजिक दबावाला बळी पडू नका.

right partner
Health Issue: प्रियांका चोप्रा 'या' गंभीर आजाराने ग्रस्त, कशी घ्यावी काळजी जाणून घ्या सविस्तर

२. एखाद्या व्यक्तीची पारख करणे.

तुम्ही घाईघाईत लग्न करत असाल आणि चांगली नोकरी, स्टेटल, लुक किंवा सोशल मीडिया प्रोफाइल पाहून लग्नाचा निर्णय घेत असाल तर भविष्यात अनेक अडचणी येतील. तुम्ही त्यासगळ्या ऐवजी नात्यात असलेला समजुतदारपणा पाहू शकता.

३. नात्यातला संवाद

बरेचदा लग्नापुर्वी आपण असं गुहित धरतात की, लग्नानंतर सगळ्या समस्या सुटतील. त्यासाठी नात्यात संवाद साधावा लागतो. त्याने जोडीदाराचा स्वभाव, वागणे बोलणे, स्वप्न, विचार तसेच अपेक्षा आपल्याला कळतात.

४. जोडीदाराला कमी लेखू नये.

नविन व्यक्तीची ओळख झाली असेल किंवा नसेल पण त्यांना कधीच कमी लेखू नका. त्याने तुमचा स्वभाव खूप रागीट आहे असे समोरच्याला वाटू शकते.

५. वाईट सवयींना कधीच करू नका दुर्लक्ष

बऱ्याच वेळेस लग्नाच्या जबरदस्तीमुळे लोक जोडीदारच्या वाईट सवयींकडे दुर्लक्ष करतात. त्यांना असं वाटतं की, लग्न झाल्यानंतर गोष्टी सुधारतील. निवडलेल्या जोडीदाराच्या वागण्यात वारंवार त्याच गोष्टी पाहायला मिळत असतील तर त्या गोष्टींकडे गांभीर्याने पाहा.

right partner
Diabetes Diet: बद्धकोष्ठता-डायबिटीजला नैसर्गिक उपाय! 'ही' ५ कडधान्यं ठरतील फायदेशीर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com