Friday Horoscope : करिअरमध्ये नवी संधी अन् बक्कळ कमाई, 'या' ५ राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट, वाचा शुक्रवारचं राशिभविष्य

Horoscope Today Update News : मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या करिअर, व्यवसाय, आर्थिक लाभ, नातेसंबंध आणि यशाबाबतचे सविस्तर राशिभविष्य.
Daily Horoscope, Friday Horoscope
Daily Horoscope, Friday Horoscopesaam TV marathi
Published On: 

मेष : तुमचा आजचा दिवस मनासारखा जाईल. हातातील कामे पूर्ण होतील आणि तुम्ही केलेल्या कामांना यश मिळेल. तुम्ही वादांपासून जितके दूर राहाल, तितके ते तुमच्यासाठी चांगले होईल. पैशाशी संबंधित बाबींमध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा टाळा.

वृषभ : तुम्ही अनुभवी लोकांकडून शिकाल आणि सल्ला घ्याल. तुम्ही मैत्री जपण्यात पुढाकार घ्याल. तसेच सर्वांशी सहकार्य करत राहाल.

मिथुन : तुम्ही दैनंदिन कामे पूर्ण कराल. करिअरच्या संधी वाढतील. देवीच्या कृपेने धनलाभ होण्याची शक्यता आहे.

Daily Horoscope, Friday Horoscope
Tea Leaves : चहा पिऊन चोथा कुंडीतल्या झाडांना घाला; ८ दिवसात दिसतील 'हे' 6 चमत्कार

कर्क : तुम्ही सर्वांचा आदर कराल. तसेच कामाच्या ठिकाणी सहकार्य वाढवाल.तुम्ही सर्वांना सोबत घेऊन पुढे जाल. तुमच्या कामाची व्याप्ती वाढेल. करिअरच्या नवीन संधी वाढणार असून पगार वाढ होईल.

सिंह : आज तुमच्या घरी एखादी आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे. जवळच्या व्यक्तीला वेळ द्याल. गुंतवणूक करण्याचा आजचा दिवस शुभ असेल.

कन्या : नवीन विषय हाताळाल. करिअरची सुवर्णसंधी तुमच्याजवळ चालून येईल. आर्थिक प्रगती चांगली राहील. तुम्हाला आकर्षक प्रस्ताव मिळतील. तुमचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी होईल.

Daily Horoscope, Friday Horoscope
Health Care : ओव्हरथिंक करून वैतागलात का? 6 उपाय करा, आजूबाजूला दुःख फिरकणारही नाही

तूळ : नातेवाईक सहकार्य करतील. अतिउत्साही होऊ नका. विरोधापासून सावध रहा. करिअर आणि व्यवसाय सुरळीत राहील.तुम्हाला पैशांची उणीव भासणार नाही.

वृश्चिक : आर्थिक बाबतीत चांगली बातमी मिळेलं. तुमच्या करिअर आणि व्यवसायात यश मिळेल. व्यावसायिक कामे पूर्ण कराल. उल्लेखनीय काम पूर्ण होईल.

धनु : तुम्ही व्यावसायिक बाबींमध्ये सक्रिय राहाल. तुम्ही व्यवस्थापनाच्या बाबतीत आघाडीवर राहाल. वडिलोपार्जित बाबींना गती मिळेल. तुम्ही तुमची क्षमता दाखवण्यात आघाडीवर राहाल.

मकर : तुम्ही तुमच्या आर्थिक प्रयत्नांमध्ये प्रगती कराल. तुम्हाला चांगली बातमी मिळेल. तुम्ही सर्वांना एकत्र आणण्यात यशस्वी व्हाल. तुमची श्रद्धा आणि आध्यात्मिकता अधिक दृढ होईल.

Daily Horoscope, Friday Horoscope
Vastu Shastra : पैशांचं लॉकर घरातील 'या' बाजूला असावी, अन्यथा घरी येईल दारिद्र्य; वास्तू शास्त्र काय सांगतं, जाणून घ्या

कुंभ: तुम्हाला जवळच्या लोकांकडून पाठिंबा मिळेल. तुम्ही महत्त्वाच्या कामांवर अधिक लक्ष केंद्रित कराल. तुम्ही शिस्तीचे पालन कराल. तुमच्या करिअर आणि व्यवसायात जोखीम घेणे टाळा.

मीन: तुमचे नातेसंबंध अधिक दृढ होतील. तुम्ही महत्त्वाच्या बाबींमध्ये यशस्वी व्हाल. अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com