

बुध हा ग्रहांचा राजकुमार आहे. बुध ग्रह एका ठराविक वेळेनुसार अस्त आणि उदय होतो. हिंदू पंचांगानुसार, बुध सध्या त्याच्या अस्त अवस्थेत आहे. बुधाचे अस्त गोचर शनिवारी २३ मे २०२६ रोजी रात्री ८:०१ वाजता होणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचं अस्त सामान्यतः शुभ मानलं जात नाही. कारण यावेळी ग्रह त्यांची शक्ती गमावतात. मात्र बुधाच्या बाबतीत गणना थोडी वेगळी आहे. जेव्हा बुध अस्त होतो तेव्हा तो विशिष्ट राशींसाठी विशिष्ट परिस्थितीत नकारात्मक प्रभाव कमी करण्याचे कार्य करतो. जाणून घेऊया बुधाच्या अस्तामुळे कोणत्या राशींना फायदा होऊ शकणार आहे.
मेष राशीसाठी बुध ग्रहाच्या अस्तामुळे मानसिक तणाव कमी होणार आहे. जर तुमच्या कामात शत्रूंमुळे अडथळा येत असेल तर आता सर्व दूर होणार आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. पैशासंबंधीची चिंता कमी होणार आहे.
सिंह राशीसाठी बुध संपत्ती आणि लाभाच्या घराचा स्वामी आहे. बुधाच्या अस्तादरम्यान तुमची ऊर्जा बाह्य जगाऐवजी आत्म-विकासावर केंद्रित होणार आहे. तुम्हाला त्रास देणाऱ्या पूर्वीच्या गुंतवणुकीच्या कल्पनेवर तोडगा निघू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या मतांचा विचार करावा लागणार आहे.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचं अस्त होणं शुभ ठरणार आहे. जर तुम्ही कोणत्याही कायदेशीर समस्यांशी झुंजत असाल, तर त्या कमी होणार आहे. संशोधन किंवा विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांची एकाग्रता वाढणार आहे.
Disclaimer : राशीभविष्य ज्योतिषशास्त्राच्या आधारे तयार करण्यात आलं आहे. या माहितीवर आधारित घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.