

काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात ४० नंतर प्रगतीचा काळ सुरू होतो,
‘लॉकिंग पिरियड’ या संकल्पनेनुसार काही काळ संघर्षानंतर नशीब आणि परिस्थिती बदलू शकते.
मात्र कोणतीही राशी ४० वर्षांनंतर निश्चितच श्रीमंत किंवा यशस्वी होईल, याला वैज्ञानिक आधार नाही.
जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या आयुष्यातील संघर्ष काही केल्या संपत नाहीत आणि सर्वोत्तम प्रयत्न करूनही यश तुमच्यापासून दूरच राहत आहे, तर ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या नशिबाचा 'लॉक-इन कालावधी' तपासू शकता. या शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीचे नशीब एका विशिष्ट कालावधीनंतरच पलटत असते.
तुम्ही कोणत्याही उद्योगात किंवा क्षेत्रात कार्यरत असलात, तरी तुमच्या असे लक्षात आले असेल की काही लोकांचे नशीब वयाच्या चाळीशीनंतर एका लक्षणीय वळणावर येते आणि ते यशाची शिखरे वेगाने चढत असतात. परंतु हे प्रत्येकाच्या बाबतीत घडत नाही. प्रामुख्याने पाच विशिष्ट राशींच्या व्यक्तींनाच वयाच्या चाळीशीनंतर संपत्ती आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. त्या राशी कोणत्या आहेत, ते आपण जाणून घेऊया.
राशीचक्रातील दुसरी रास असलेल्या 'वृषभ' राशीचे लोक त्यांच्या कष्टाळू, प्रामाणिक आणि संयमी स्वभावासाठी ओळखले जातात. तरीही, करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांना अनेकदा त्यांच्या कष्टाचे योग्य फळ मिळत नाही, ज्यामुळे निराशा पदरी पडते. साधारणपणे वयाच्या चाळीशीनंतर नशीब त्यांना साथ देऊ लागते. या काळात त्यांनी मिळवलेल्या अनुभवाच्या जोरावर आणि योग्य निर्णय घेऊन ते प्रचंड संपत्ती व प्रतिष्ठा प्राप्त करतात.
कन्या ही राशीचक्रातील सहावी राशी असून ती परिपूर्णतेच्या ध्यासासाठी ओळखली जाते. तरीही सुरुवातीच्या काळात हे लोक इतरांची मदत घेण्याच्या प्रयत्नात बऱ्याचदा आपला बराचसा वेळ वाया घालवतात. एकदा का त्यांना स्वतःवरती आत्मविश्वास आला की, ते सहगत्या यश मिळवत असतात. मात्र ते वयाच्या चाळीशीनंतर होते. ते आपल्या तार्किक बुद्धिमत्तेचा आणि कौशल्यांचा वापर करून आपली कारकीर्द किंवा व्यवसाय यशाच्या अत्युच्च शिखरावर नेतात आणि प्रचंड संपत्ती कमावतात.
हे राशीचक्रातील दहावे राशीचिन्ह असून शनि हा याचा स्वामी ग्रह आहे. या राशीचे लोक अत्यंत शिस्तप्रिय असतात. सुरुवातीच्या काळात अनुभवाच्या अभावामुळे त्यांना अनेकदा संघर्षाचा सामना करावा लागतो; तरीही, ते आपल्या जबाबदाऱ्यांपासून कधीही माघार घेत नाहीत. वयाची चाळीशी गाठल्यानंतरच ग्रह विशेषतः शनी त्यांच्यावर अनुकूल होतात. त्यानंतरच ते मोठे यश संपादन करतात आणि यशाची उत्तुंग शिखरे गाठतात.
टीप: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीच्या उद्देशाने दिली आहे. साम टीव्ही त्याला दुजोरा देत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.