Shani Gochar: गुरुच्या राशीत प्रवेश करणार शनीदेव; नवीन वर्षात 'या' राशींना लागणार लॉटरी, नशीब फळफळणार

Shani Gochar 2025 Positive Effect: शनि हा ग्रह मानला जातो जो न्याय आणि कर्माचं फळ देतो. मीन राशीतील शनीचं गोचर सर्व राशीच्या लोकांवर परिणाम करणार आहे.
Shani Gochar
Shani Gochar 2025Saam Tv
Published On

2024 या वर्षाचा शेवटचा महिना सुरु आहे. पुढचं वर्ष २०२५ हे ज्योतिष्य शास्त्राच्या हिशोबाने खूप खास मानलं जातं. याचं कारण म्हणजे या वर्षी अनेक मोठे ग्रह गोचर करणार आहेत. यामध्ये शनी ग्रहाचा समावेश आहे. शनी ग्रह वर्षाच्या सुरुवातीला आपली राशी बदलणार आहे.

वैदिक कॅलेंडरनुसार, 29 मार्च 2025 रोजी न्यायाधीश शनी कुंभ राशीतून बाहेर पडून गुरुच्या राशीत मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनी सुमारे अडीच वर्षे या राशीत राहील आणि त्यानंतर तो मेष राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शनि हा ग्रह मानला जातो जो न्याय आणि कर्माचं फळ देतो. मीन राशीतील शनीचं गोचर सर्व राशीच्या लोकांवर परिणाम करणार आहे.

Shani Gochar
Malavya Rajyog: 2025 मध्ये शुक्र ग्रह बनवणार मालव्य राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा

शनीच्या गोचरमुळे काही राशीच्या लोकांना या राशीतून विशेष लाभ मिळू शकणार आहे. या काळात या राशींना भरघोस नफा मिळण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया शनीच्या गोचरमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे.

Shani Gochar
Malavya Rajyog: 2025 मध्ये शुक्र ग्रह बनवणार मालव्य राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी शनीचं गोचर खूश असणार आहे. या काळात कौटुंबिक जीवन आनंदी राहणार आहे. तुम्हाला आर्थिक लाभ मिळणार आहे. नोकरीत प्रगती आणि व्यवसायात लाभ होणार आहे. त्याचप्रमाणे या काळात नोकरीतही बढती मिळण्याची शक्यता आहे. हा तुमच्यासाठी प्रगतीचा काळ असणार आहे.

Shani Gochar
Grah Vakri: शनी-शुक्रासोबत ४ ग्रह नव्या वर्षात चालणार वक्री चाल; 'या' राशींची होणार भरभराट, बक्कळ पैसाही मिळणार

मिथुन रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी शनीचं गोचर खूप शुभ राहणार आहे. शनी तुमच्या अकराव्या घरात असणार आहे. या काळात कौटुंबिक जीवन आनंदी राहणार आहे. या काळात तुम्हाला नोकरीतही बढती मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीचं चांगले फळ मिळू शकणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होणार आहेत.

Shani Gochar
Shani Gochar 2025: नव्या वर्षात 'या' राशींना मिळणार शनीच्या साडेसातीपासून मुक्ती; जगणार राजासारखं आयुष्य

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी शनी तिसऱ्या घरात प्रवेश करणार आहे. 2025 मध्ये मकर राशीच्या लोकांसाठी शनीची साडेसाती संपणार आहे. तुमची प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकणार आहेत. या काळात तुमचे जुने पैसे परत मिळू शकणार आहेत. नोकरीत पगार आणि व्यवसायात नफा वाढू शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे.

Shani Gochar
Gajkesri Yog: पुढच्या वर्षी गुरु-चंद्राच्या युतीने बनणार खास राजयोग; 'या' राशींचा बँक बॅलन्स वाढणार, लग्नातील अडथळेही दूर होणार

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com