Malavya Rajyog: 2025 मध्ये शुक्र ग्रह बनवणार मालव्य राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा

Malavya Rajyog 2025: शुक्राच्या गोचरमुळे मालव्य नावाचा राजयोग निर्माण होणार आहे. मालव्य राजयोगामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.
Horoscope
HoroscopeSaam Tv
Published On

नवीन वर्ष हे ग्रहांच्या हालचालीसाठी फार महत्त्वाचं मानलं जातंय. लवकरच नवीन वर्ष 2025 सुरूवात होणार असून शनि, राहू-केतू यांसारखे महत्त्वाचे ग्रह राशी बदलणार आहेत. ग्रहांच्या या स्थिती बदलाचा प्रत्येक राशींच्या जीवनावर परिणाम होणार आहे. यावेळी अनेक प्रकारचे शुभ-अशुभ योगही तयार होणार आहे.

नव्या वर्षात नवग्रहांपैकी एक, राक्षसांचा गुरू शुक्र देखील दर महिन्याला आपली राशी बदलणार आहे. सुख-समृद्धी, ऐश्वर्य-वैभव, सौंदर्य यांचा कारक शुक्र असून त्याचा परिणाम प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर होतो. दरम्यान शुक्राच्या गोचरमुळे मालव्य नावाचा राजयोग निर्माण होणार आहे. मालव्य राजयोगामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.

Horoscope
December Horoscope 2024: डिसेंबर महिन्यात 'या' राशींना राहावं लागणार सावध, धनहानीसोबत कुटुंबात होऊ शकतात कलह

कर्क रास

या राशीच्या लोकांसाठी मालव्य राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो. या काळात लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. त्याचप्रमाणे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन प्रोजेक्ट किंवा ऑर्डर मिळू शकणार आहे. उत्पन्नातही झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशी चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकतात.

Horoscope
Mangal Vakri 2024: ७ डिसेंबरपासून या राशींच्या आयुष्यात होणार उलथापालथ; खर्च वाढल्याने आर्थिक संकट येणार

धनु रास

या राशीच्या सहाव्या घरात मालव्य राजयोग तयार होणार असून प्रदीर्घ प्रलंबित कामं पुन्हा सुरू होणार आहेत. यावेळी करिअर आणि बिझनेसमध्ये बरेच फायदे होणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. मालव्य राजयोग व्यवसायासाठीही खूप फायदेशीर ठरू शकणार आहे.

Horoscope
Budh Uday 2024: 12 डिसेंबरला होणार बुध ग्रहाचा उदय; 'या'राशींना मिळणार आकस्मिक धनलाभ, संकटं होणार दूर

मीन रास

या राशीमध्ये चढत्या घरात मालव्य राजयोग तयार होणार असून अशा परिस्थितीत तुम्ही अधिक सर्जनशील होऊ शकता. लाइफ पार्टनरसोबतचं नातं घट्ट होऊ शकणार आहे. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे.

Horoscope
Ketu Gochar 2024: डिसेंबर महिन्यात 'या' ३ राशी होणार कंगाल; केतूच्या गोचरने काहींच्या आयुष्यात येणार भूकंप

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com