

रविवार,१३ एप्रिल २०२५,चैत्र कृष्णपक्ष.
तिथी-प्रतिपदा (अहोरात्र)
रास-कन्या ०७|३९ नं. तुला
नक्षत्र-चित्रा
योग-हर्षण
करण-बालव
दिनविशेष-वृद्धीतिथी
मेष - कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभणार आहे. काहींना आरोग्याच्या तक्रारी सुद्धा जाणवतील. यातून बाहेर यावे लागेल. उष्णतेचे विकार भेडसावतील.
वृषभ - संतती सौख्य चांगले मिळेल. उत्साह उमेद वाढवणाऱ्या घटना घडणार आहेत. पैशाची गुंतवणूक फलदायी ठरेल. दिवस चांगला आहे. देवी उपासना करावी.
मिथुन - दैनंदिन कामे मार्गी लागतील. राहत्या जागेचे प्रश्न निर्माण होतील. पण त्यातून सहजगत्या वाट काढावी लागेल. यासाठी कुटुंबीयांची मदत घ्यावी लागेल.
कर्क - नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. स्वतःच्या प्रगतीसाठी जिद्द आणि चिकाटी वाढेल. अध्यात्मिक प्रगती सुद्धा होईल. लहान प्रवासातून फायदा दिसतो आहे.
सिंह - व्यवसायामध्ये नवीन तंत्र आणि मंत्र अमलात आणाल . कौटुंबिक जीवनामध्ये सुसंवाद साधण्याचा आज योग आहे. भावंड सौख्य उत्कृष्ट राहील. दिवस चांगला आहे.
कन्या - उत्साह आणि उमेद वाढवणाऱ्या घटना घडतील. आपले आरोग्य चांगले राहील. मानसिकता चांगली ठेवल्यास दिवस चांगला जातो हे आपल्या राशीला पक्के माहिती आहे. विनाकारण उपद्व्यापी विचार नको.
तूळ - धर्माकडे कल आपोआपच राहील. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. सहज गोष्टींना धरबंद राहत नाही हे आज लक्षात येईल. कामामधली चपळता वाढवावी लागेल.
वृश्चिक - अनेकांच्या सहकार्याने पुढे जाणार आहात. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. जवळच्या व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. आनंदाने दिवस साजरा कराल.
धनु - सामाजिक क्षेत्रामध्ये सहभागी व्हाल. प्रियजनांचा सहवास लाभेल. मनासारख्या गोष्टी घडतील. करिअरला एक वेगळे वलय प्राप्त होईल. दिवस चांगला आहे.
मकर - भाग्यकारक घटनांचा कालावधी आहे. शिव उपासना करावी एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. रखडलेली कामे सुद्धा मार्गी लागतील.
कुंभ - आज वाहने जपून चालवावीत. काही केल्या आपल्या हातात गोष्टी नसतात हे आज जाणवेल. करून सोडून सर्व वेळ आणि पैसा वाया जाण्याची दाट शक्यता आहे.
मीन - वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद साधाल. इतरांवर तुमचा प्रभाव राहील. साधेपणाने गोष्टी साध्य होत नसतात हे लक्षात घ्या. काही गोष्टी प्रयत्न आणि बुद्धिवाद दोन्ही गरजेच्या असतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.