Dhanshri Shintre
वास्तुशास्त्रानुसार घर योग्य रचल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते, यामध्ये किचन आणि देवघरासंबंधीही ठराविक नियम असतात.
किचन अग्नितत्वाचं प्रतीक असून, तिथून राजसिक-तामसिक ऊर्जा निर्माण होते, तर देव्हाऱ्यात शांत व सकारात्मक ऊर्जा असते.
किचनमध्ये अग्नी व जलतत्व कार्यरत असतात, त्यामुळे उर्जेचा संघर्ष होतो आणि देव्हाऱ्यातील सकारात्मक ऊर्जा कमी होते.
ईशान्य कोपरा देव्हाऱ्यासाठी शुभ मानला जातो, पण किचन जवळ असल्यास सकारात्मक ऊर्जा कमी होण्याची शक्यता असते.
देव्हारा किचनजवळ असेल, तर नकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्याचा थेट परिणाम घरातील लोकांच्या आरोग्यावर होतो.
ज्योतिषशास्त्रानुसार, किचनजवळ देव्हारा असल्यास राहु-केतूचा प्रभाव वाढतो, ज्यामुळे अपघात व आजारांचे प्रमाण वाढते.
देव्हारा हे पूजेसाठी पवित्र स्थान असून, तो योग्य ठिकाणी असल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मानसिक शांती लाभते.