Vastu Tips: ज्योतिषशास्त्रानुसार सोनं हरवणे शुभ की अशुभ? वाचा सविस्तर

Dhanshri Shintre

पवित्र धातू

हिंदू धर्मानुसार प्रत्येक धातू पवित्र मानला जातो, तर सोने देवी लक्ष्मीचे स्वरूप म्हणून पूजले जाते.

समृद्धीचे प्रतीक

अक्षय तृतीया, धनतेरस आणि दिवाळीला सोने खरेदी व पूजन करणे शुभ व समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

ऐश्वर्याचे प्रतीक

ज्योतिषशास्त्रानुसार, सोने हे गुरु ग्रहाशी जोडलेले असून ते सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते.

अशुभ घटना

एखाद्याचे सोने हरवणे हे ज्योतिषशास्त्रानुसार दुर्भाग्याचे आणि अशुभ घटना घडण्याचे संकेत मानले जातात.

ग्रहाचे शांतिपाठ करणे

सोने हरवले किंवा चोरीला गेले असल्यास, सर्वप्रथम गुरु ग्रहाचे शांतिपाठ करणे अत्यंत आवश्यक मानले जाते.

गुरु ग्रहासाठी लाभदायक

गुरुवारी पिवळ्या वस्त्रांसह हरभरा डाळ किंवा अन्य शुभ गोष्टींचे दान करणे गुरु ग्रहासाठी लाभदायक मानले जाते.

नकारात्मक ऊर्जा

या दिवशी भगवान विष्णू व देवी लक्ष्मीची पूजा केल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सौख्य लाभते.

आर्थिक अडचणी

ज्योतिषशास्त्रानुसार, सोने हरवल्याने आर्थिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते आणि आर्थिक स्थैर्यावर विपरीत परिणाम होतो.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

NEXT: चिकूला संस्कृतमध्ये काय म्हणतात? नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटेल

येथे क्लिक करा