Saam Tv
घरात तिजोरी असणे महत्वाचे आहे. तसेच त्यामध्ये पैसा टिकणे सुद्धा महत्वाचे आहे.
तुम्ही खूप कष्ट करुन पैसा कमवत असाल आणि तो टिकतच नसेल. तर, तुम्ही पुढील उपाय करू शकता.
पुजेत वापरलेल्या सुपारीचा खंड तुम्ही तिजोरीत ठेवा. त्याने लक्ष्मीचा सहवास घरात राहतो.
शुक्रवारी पिवळे वस्त्रामध्ये चांदीचे नाणे ठेवा. त्याने काहीच दिवसात तुम्हाला फरक जाणवेल.
तुम्ही १० रुपयांच्या नोटा तिजोरीत ठेवू शकता. त्याने तुमचा खर्च कमी होईल.
पिंपळाच्या पानावर कुंकवाने ॐ लिहून तिजोरीत ठेवा. त्याने लक्ष्मी प्रसन्न राहील.
तुम्ही शंख तिजोरीत ठेवल्याने लक्ष्मी आकर्षित होईल.
मोराच्या पंखावर चंदनाने श्री लिहून तिजोरीत ठेवा.