

आजचे पंचांग
शुक्रवार,३ जानेवारी २०२५,पौष शुक्लपक्ष,
विनायकी चतुर्थी.
तिथी- चतुर्थी २३|४०
रास- मकर १०|४८ नं. कुंभ
नक्षत्र-धनिष्ठा
योग- वज्र
करण-वणिज
दिनविशेष-१२ प. चांगला
मेष - आज विनायक चतुर्थी. विशेष गणेश उपासना फलदायी ठरेल. कामाच्या ठिकाणी धावपळ आणि दगदग राहील. विशेष प्रवास घडतील. करिअरला दिवस उत्तम आहे.
वृषभ - कलाकारांना दिवस भरभरून काहीतरी पदरात दान टाकणार आहे. स्वतःचा आत्मविश्वास वाढता ठेवा. देवाने अनेक गोष्टीचे आपल्यासाठी नियोजन केले आहे. त्या तुम्हाला मिळणारच आहेत.
मिथुन - खोट्या पैशाच्या नादाला लागून चुकीच्या गोष्टी करू नका. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. आपल्या बोलण्यामुळे कुठे आपण अडचणीत येणार नाही ना याची काळजी घ्या. अचानक धनलाभ संभवतो आहे.
कर्क - जोडीदाराकडून सुखात वाढ होईल. दोघांचे विशेष bonding आज राहणार आहे. दिवस आनंद आणि सुखाच्या लहरी घेऊन येणार आहे. कोर्टाचे निकाल सुद्धा मनाप्रमाणे लागतील.
सिंह- हृदयविकार, पाठीचे दुखणे, मानसिक ताण अशा प्रकारचे दुखणे डोके वर काढतील. तब्येतीची काळजी घ्यावी. कनिष्ठ वर्गाकडून आज आपल्यासाठी सावधगिरीचा इशारा आहे.
कन्या- आज विशेष विष्णू उपासना फलदायी ठरणार आहे. प्रेमामध्ये अखंड बुडून प्रणय आराधना करण्याचा आजचा दिवस आहे. आजपर्यंत केलेल्या गोष्टींचे चीज होताना आज दिसून येईल. दिवस आनंदी आहे.
तूळ - घरी नवीन वस्तूंची खरेदी होईल. गाडी खरेदी किंमत अशा गोष्टी आज प्राधान्य क्रमाने होतील. कुटुंबामध्ये वातावरण छान राहिल्यामुळे मनाला एक वेगळी उभारी येईल.
वृश्चिक - जवळच्या लोकांशी अबोला संभवतो आहे. आपल्या कामावरच आज आपण अधिक लक्ष केंद्रित करणं जास्त योग्य राहील. वरिष्ठांच्या कडून शाब्बासकीची थाप नक्कीच मिळेल. दिवस संमिश्र आहे.
धनु - "इकडे आड तिकडे विहीर" अशी आज अवस्था होईल. संदिग्ध अवस्था राहील.आज झालेल्या पैशाची योग्य गुंतवणूक केल्यास पुढील कालावधीमध्ये उत्तम परतावा मिळण्याचे योग आहेत.
मकर -"आपण भले आपले काम भले" असे केल्यास दिवस चांगला राहील. विनाकारण निराशजनक गोष्टींचे मळभ आजूबाजूला फिरकू देऊ नका. कामात व्यस्त रहा आणि मस्त रहा.
कुंभ - पैशाला अनेक वाटा आहेत त्यातूनच तुम्हाला पळवाटा काढाव्या लागतील. विनाकारण मनस्ताप टाळा. परिस्थितीशी दोन हात करा.
मीन - सून - जावयांचा विशेष स्नेह लाभेल. त्यांच्याकडून मिळालेल्या आदराने कृतकृत्य झाल्याची भावना होईल. अनेक लाभ पदरात मिळतील. दिवस सुखाचा जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.