Horoscope
HoroscopeSaam Tv

Shani Margi 2024: शनीच्या मार्गी चालीने अडचणी वाढणार; 'या' राशींवर राहणार शनिदेवाचं सावट!

Shani Margi 2024: शनी यावेळी स्वतःच्या कुंभ राशीत मार्गी चाल चालणार आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार, ज्यावेळी शनी स्थिती बदलतो तेव्हा सर्व राशींवर त्याचा चांगला आणि वाईट परिणाम होतो.
Published on

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, काही ग्रह गोचरप्रमाणे वक्री आणि मार्गस्थ होतात. सध्या नोव्हेंबर महिना सुरु असून या १५ नोव्हेंबर रोजी शनी देवाने त्याची स्थिती बदलली आहे. शुक्रवारी शनी देव मार्गी झालेत. ज्योतिष शास्त्रानुसार, ज्यावेळी शनी स्थिती बदलतो तेव्हा सर्व राशींवर त्याचा चांगला आणि वाईट परिणाम होतो.

शुक्रवारी 15 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5:09 वाजता शनी मार्गस्थ होणार आहे. शनी यावेळी स्वतःच्या कुंभ राशीत मार्गी चाल चालणार आहेत. ज्याचा 3 राशींवर अशुभ प्रभाव पडू शकणार आहे. या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींना अशुभ प्रभावाला सामोरं जावं लागतंय ते पाहा.

Horoscope
Padmak Yog 2024: सूर्य-चंद्र तयार करणार अत्यंत दुर्मिळ पद्मक योग; 'या' राशींच्या घरी येणार फक्त पैसा

मिथुन रास

नीट विचार करूनच कोणताही निर्णय घेणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. जे काम करायचा विचार कराल ते कोणीतरी आधीच बिघडवायला तयार असणार आहे. कुटुंबियांशी वाद होऊ शकतो. या काळात बिझनेसमध्ये तुमचं नुकसान होणार आहे.

Horoscope
Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

सिंह रास

तुम्हाला शनीच्या वाईट प्रकोपाचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. तुम्ही यावेळी वादात अडकू शकता. त्यामुळे भांडणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. कोर्टाचे निकाल तुमच्या बाजूने लागणार नाहीत.

वृश्चिक रास

यावेळी तुमचं मन उदासीन राहणार आहे. यावेळी तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. तुमचं इतर कुणाशी भांडण होऊ शकतं. तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला त्रास होऊ शकतो.

Horoscope
Gajkesari Yog: गुरु चंद्राच्या युतीने बनला गजकेसरी राजयोग; 'या' राशींना मिळणार डबल इनकम; आयुष्यात होणार धनवृष्टी

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com