एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात, असं वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये म्हटलं आहे. यामध्ये सर्वात वेगाने गोचर करणारा ग्रह म्हणजे चंद्र. चंद्र एका राशीत सुमारे अडीच वर्ष राहतो. या काळात चंद्राचा इतर ग्रहांशी संयोग होतो आणि शुभ किंवा अशुभ योग निर्माण होतो. असंच येत्या काळात गजकेसरी राजयोग तयार झाला आहे.
नोव्हेंबर महिन्यात चंद्र आणि गुरूचा संयोग लवकरच झाला आहे. त्यामुळे हा राजयोग तयार होणार आहे. या वेळी गुरु ग्रह वृषभ राशीमध्ये स्थित असणार आहे. 15 नोव्हेंबर रोजी पहाटे 3.16 वाजता चंद्र वृषभ राशीत प्रवेश केला आहे. याठिकाणी देवांचा गुरु बृहस्पति आधीच उपस्थित असतो. अशा स्थितीत गुरू आणि चंद्राच्या संयोगामुळे गजकेसरी राजयोग तयार झाला असून हा राजयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
गजकेसरी योगाच्या निर्मितीमुळे या राशीच्या लोकांना आर्थिक लाभासोबतच प्रत्येक क्षेत्रात भरपूर यश मिळेल. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. तुमची मेहनत पाहून तुम्हाला वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळू शकणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही नफा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे.
या राशीमध्ये गुरू आणि चंद्राचा संयोग अकराव्या भावात होतोय. अशा स्थितीत या राशीच्या लोकांनाही अमाप संपत्ती मिळू शकणार आहे. करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला बढती मिळू शकणार आहे. तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलल्यास तुम्हाला खूप पैसे मिळू शकतात. कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता.
या राशीच्या लोकांसाठीही गजकेसरी योग काही प्रमाणात फायदेशीर ठरू शकणार आहे. कुटुंबातील दीर्घकाळ चाललेली समस्या संपुष्टात येऊ शकणार आहे. व्यवसायाच्या क्षेत्रातही भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.