Todays Horoscope: कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी, पैसा मिळेल; वाचा शुक्रवारी तुमच्या राशीत काय लिहिलंय?

२२ मे २०२६ चे संपूर्ण राशीभविष्य जाणून घ्या. करिअर, आर्थिक स्थिती, प्रेमसंबंध, आरोग्य आणि कौटुंबिक जीवनाबाबत सर्व १२ राशींसाठी काय खास घडणार आहे ते वाचा एका क्लिकमध्ये.
TODAY HOROSCOPE in Marathi
TODAY HOROSCOPE Saam tv
Published On

मेष

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना वरिष्ठांकडून चांगला प्रतिसाद मिळू शकतो. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसोबत जुना गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत खर्चावर नियंत्रण ठेवले तर दिवस अधिक समाधानकारक जाणार आहे.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. तुम्ही काहीतरी नवीन हाती घेऊ शकता. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. आर्थिक योजनांना बळकटी मिळणार आहे. तुमचे व्यक्तिमत्व लोकांना प्रभावित करणार आहे.

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींना आज गुरू आणि शुक्र ग्रहांच्या गोचराचं अनुकूल परिणाम अनुभवायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कमी झालेलं तुमचं मनोधैर्य वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढणार आहे. तुम्ही काम व कौटुंबिक जबाबदाऱ्या अधिक चांगल्या प्रकारे सांभाळू शकाल. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे.

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींना बळ मिळणार आहे. तुमचं काम चांगलं होणार आहे. तुमचा जीवनात आर्थिक समस्या येणार नाहीत हे पाहा. तुम्हाला तुमच्या भावंडांकडून पाठिंबा मिळणार आहे. तुम्हाला व्यवसायात नफा मिळवण्यासाठीही मदत करणार आहे.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांना प्रत्येक उपक्रमांमधून लाभ मिळणार आहे. तुमचा सामाजिक प्रभाव आणि आदर वाढणार आहे. तुम्ही व्यवसायात तुमच्या विरोधकांवर मात करू शकणार आहात. तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळणार आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या पूर्वीच्या कामातून लाभ मिळणार आहे. तुमच्या व्यावसायिक योजना यशस्वी होणार आहेत. सहकाऱ्यांच्या पाठिंब्याने तुम्ही फायद्याच्या संधी साधू शकाल. तुम्हाला काही नवीन जबाबदाऱ्याही मिळू शकतात. तुमचं आरोग्य सामान्य राहणार आहे. तुम्हाला कुटुंबातील वडीलधाऱ्यांकडून पाठिंबा मिळणार आहे.

TODAY HOROSCOPE in Marathi
Shukra Gochar: शुक्राचं मिथुन राशीत होणार गोचर; 25 दिवस या ३ राशींच्या जीवनात येणार अडथळे

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस उत्साहवर्धक असेल. तुम्ही कामाच्या ठिकाणी तुमच्या योजनेनुसार काम करू शकाल. तुमची कार्यक्षमता तुम्हाला परिस्थिती तुमच्या बाजूने ठेवण्यास मदत करणार आहे. तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही तुमच्या छंदांवर पैसे खर्च करणार आहात.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुभ दिवस असणार आहे. वडील आणि काका यांच्याकडून पाठिंबा मिळेल. तुमचे नशीब तुम्हाला तुमच्या नोकरी आणि व्यवसायात यश मिळवून देईल. तुम्हाला काही नवीन संधीही मिळू शकणार आहेत. तुम्ही पूर्वी केलेल्या काही कामासाठी तुम्हाला लाभ आणि मान्यता देखील मिळू शकते.

धनु रास

धनु राशीसाठी सर्वसाधारणपणे चांगला दिवस असणार आहे. आर्थिक बाबी फायदेशीर ठरतील आणि तुम्हाला अनपेक्षित स्रोताकडून लाभही मिळू शकतो. तुम्हाला अशी माहितीही मिळू शकते, जी तुम्हाला आनंदित करेल. प्रेमसंबंध दृढ राहणार आहेत. तुम्हाला एका ज्येष्ठ व्यक्तीकडून आधार मिळू शकतो.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस संमिश्र असणार आहे. एखादं महत्त्वाचं काम लांबणीवर पडू शकतं. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा नाहीतर वाद होऊ शकतो. अनपेक्षित खर्चामुळे तुमचं बजेट बिघडू शकणार आहे. जर तुम्ही कर्ज मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर गुरू आणि शुक्र यश मिळवून देतील.

TODAY HOROSCOPE in Marathi
Chandra Gochar 2026: चंद्र करणार बुधाच्या नक्षत्रात प्रवेश; या ३ राशींना मिळणार पैसाच पैसा

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या अनुकूल दिवस असणार आहे. दीर्घकालीन योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. चंद्र तुमच्या राशीपासून सहाव्या घरात भ्रमण करतोय. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. तुम्हाला शिक्षण क्षेत्रात यश मिळू शकतं.

मीन रास

मीन राशीसाठी आजचा दिवस सर्वसाधारणपणे चांगला असणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती संतुलित राहणार आहे. व्यवसायातील उत्पन्न सुरू राहणार असून तुम्हाला सुखसोयींचा आनंदही घेता येणार आहे. तुम्हाला तुमच्या मित्रांकडून पाठिंबा मिळणार आहे. पूर्वीच्या ओळखीच्या व्यक्तीसोबतच्या अचानक भेटीमुळे जुन्या आठवणी ताज्या होतील.

TODAY HOROSCOPE in Marathi
Guru Gochar: 2 जूनला होणार गुरुचं महागोचर; 152 दिवस या राशींच्या आयुष्यात येणार अडथळे

Disclaimer : राशीभविष्य ज्योतिषशास्त्राच्या आधारे तयार करण्यात आलं आहे. या माहितीवर आधारित घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com