November Grah Gochar 2024: नोव्हेंबर महिन्यात अनेक ग्रह करणार गोचर; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार पैसाच पैसा
ज्योतिष्य शास्त्रानुसार, दर महिन्याला काही ग्रहांचं गोचर होतं. अवघ्या १० दिवसांनी नोव्हेंबर महिन्याला सुरवात होणार आहे. या महिन्यात काही ग्रह आणि नक्षत्र त्यांच्या राशींसोबत बदलणार आहेत. ग्रहांच्या या स्थिती बदलाचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होणार आहे. यावेळी कोणत्या ग्रहांचं गोचर होणार आहे आणि कोणत्या राशींना याचा लाभ होणार आहेत ते जाणून घेऊया.
शनीदेव 15 नोव्हेंबर रोजी ते कुंभ राशीत मार्ग्रस्थ होणार आहेत. यासोबतच शुक्र, सूर्य आणि बुध या महिन्यात राशी बदलणार आहे. चंद्र दर अडीच दिवसांनी आपली राशी बदलतो, त्यामुळे त्याच्याशी कोणत्या ना कोणत्या प्रकारचा संयोग होणार आहे.
सूर्य गोचर नोव्हेंबर 2024 (Surya Gochar 2024)
सूर्य ग्रह दर महिन्याला रास बदलतो. नोव्हेंबर महिन्यात सूर्य त्याच्या राशीत बदल करणार आहे. यावेळी तो वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:14 वाजता सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करणार असून 15 डिसेंबरपर्यंत या राशीत राहणार. यावेळी वृश्चिक, मकर, कुंभ, सिंह, मेष राशींना लाभ मिळणार आहे.
शनि मार्गी 2024 (Shani Margi 2024)
हिंदू पंचांगानुसार, १५ नोव्हेंबरला शनी मार्गी होणार असून यावेळी अनेक राशीच्या लोकांचं नशीब उजळू शकणार आहे. या काळात काहींच्या जीवनात आनंद येऊ शकणार आहे. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, कन्या आणि धनु राशीच्या लोकांना याचा फायदा होणार आहे.
शुक्र गोचर नोव्हेंबर 2024 (Shukra Gochar 2024)
शुक्र २६ दिवसात त्याच्या राशीमध्ये बदल करतो. सुख, समृद्धी आणि संपत्ती देणारा शुक्र 7 नोव्हेंबर रोजी राशी बदलणार आहे. शुक्राच्या गोचरमुळे मेष, मिथुन, कन्या, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांना याचा फायदा होणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

