Horoscope Today : सूर्याचा आज पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश, कोणकोणत्या राशींचे भाग्य पालटणार? वाचा राशी भविष्य

Rashi Bhavishya 5th July 2024 : आजचे राशी भविष्य, ५ जुलै २०२४ वार शुक्रवार, आज सूर्याचा पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश होणार आहे. त्यामुळे काही राशीच्या लोकांचं भाग्य बदलणार आहे.
आजचे राशी भविष्य
Horoscope Today 5th July 2024Saam TV

आजचे पंचांग - दिनांक - ५ जुलै २०२४

वार - शुक्रवार. जेष्ठ कृष्णपक्ष. तिथी - अमावस्या. नक्षत्र आर्द्रा. योग - ध्रुव. करण - चतुष्पाद. रास - मिथुन. दिनविशेष - अमावस्या वर्ज्य.

मेष : शेजारी सख्य राहील.

खरे तर आज आपल्या स्वभावाविरुद्ध तुम्ही वागणारा आहात. शेजारी सख्य राहील. इतरांशी तडजोड करून जमून घ्यावे असे वाटेल. शेवटी काय तर आपला आनंद आपणच मिळवायचा असतो हे गुपित समजेल.

वृषभ : आनंदासाठी खर्च कराल

न ठरवता काही गोष्टी होतील पण त्यासाठी पैशाचा मोबदला मोजावा लागेल. आनंदासाठी खर्च कराल. पण हळहळ सुद्धा होईल. इतरांसाठी काम करताना स्वतःला विसरू नका.हा आज संदेश.

मिथुन : स्वतःचा आत्मविश्वास वाढेल

बोलून समोरच्याला गार कराल .नवीन कामे हातात घेतली असतील तर असती पूर्ण होतील. स्वतःचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यातून पुढील वाट सुकर होईल.

कर्क : घरी पाहुण्यांचे आगमन होईल

भावनिकतेशी आपला जवळचा संबंध आहे घरी पाहुण्यांचे आगमन होईल. कुटुंबीयांशी योग्य संवाद साधाल. दिवस आनंदाची दुथडी भरून वाहू लागेल.

सिंह : कामांमध्ये झोकून द्या

"मी पण माझे सरले" असा दिवस आहे. स्वतःला बाजूला ठेवून कामांमध्ये झोकून द्या. त्याची वाहवा मिळेल. महत्त्वाकांक्षा वाढीस लागतील. पत्रव्यवहार मार्गी लागतील.

कन्या : गोष्टींमध्ये मन गुंतवाल

बौद्धिक गोष्टींमध्ये मन गुंतवाल .पुस्तक वाचन तसेच घरी कुटुंबीयांसाठी वेळ देणे यांत वेळ जाईल. पशुधन ही मालमत्ता किती मोलाची आहे, या गोष्टी आज जाणवणार आहेत.

आजचे राशी भविष्य
Dhanu Rashi Nature : धनु राशीचे लोक असतात प्रचंड धाडसी, कसा असतो त्यांचा स्वभाव? जाणून घ्या राशीबद्दल

तूळ : चांगल्या संधी मिळतील

आपल्या राशीला कष्ट करून आनंद घेण्याची सवय आहे. क ला क्षेत्रातल्या लोकांना चांगल्या संधी मिळतील. फिरस्ती, भ्रमंती या गोष्टी होतील. त्यातच लाभ होईल. उपासनेवर भर दिल्यास अमावस्या फलदायी.

वृश्चिक : सहकाऱ्यांशी जपून वागा

लपून बसलेले आजार डोके वर काढतील. मग ते शारीरिक असो व मानसिक. आपले गुप्त शत्रू संपले असे म्हणताना आज त्यांचा त्रास उद्भवेल. हाताखालील सहकाऱ्यांशी जपून वागा.

धनु : कामे मार्गी लागतील

व्यापार व्यवसायात यश मिळण्याचा आजचा दिवस आहे. कोर्टकचेरीची कामे मार्गी लागतील. कधीकधी नको त्या गोष्टीत मनाचा विक्षिप्तपणा वाटेत आड येईल.

मकर : आज काळजी घ्या

नको ते बालंट आणि आळ आपल्यावर येण्याची शक्यता आहे. आपण त्या दृष्टीने तयारीत रहा. खूपदा न केलेल्या गोष्टींचे खापर आपल्या माठी फुटते. याच्यासाठी आपला शांत स्वभाव आड येतो. आज काळजी घ्या.

कुंभ : आध्यात्मात ओढ वाटेल

आज अमावस्या आहे. विशेष शिव उपासना केल्यास फायदा होईल. भाग्य वृध्दी करण्यासाठी दानधर्म केल्यास मनालाही समाधान वाटते. धर्मा आध्यात्म यात ओढ वाटेल.

मीन : दिवस धावपळीचा राहील

तब्येतीच्या तक्रारी असतील तर आज योग्य डॉक्टर भेटतील. कामाच्या स्वरूपाची व्याप्ती वाढेल. एकूणच दिवस हा धावपळीचा राहील.

आजचे राशी भविष्य
Horoscope Today : आज 'या' राशीच्या लोकांनी मोठी रिस्क घेणं टाळा; तुमच्या नशिबात बुधवारी काय? वाचा राशी भविष्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com