Dhanu Rashi Nature : धनु राशीचे लोक असतात प्रचंड धाडसी, कसा असतो त्यांचा स्वभाव? जाणून घ्या राशीबद्दल

Sagittarius Rashi Personality : धनु ही अग्नि तत्वाची गुरुची रास आहे. द्विस्वभावी रास आणि पुरुष रास आहे. आपला धर्म आणि आपले कर्म याला प्राधान्य देणारे लोक असतात.
Dhanu Rashi Bhavishya Today
Dhanu Rashi Bhavishya TodaySaam TV

धनु ही अग्नि तत्वाची गुरुची रास आहे. द्विस्वभावी रास आणि पुरुष रास आहे. आपला धर्म आणि आपले कर्म याला प्राधान्य देणारे लोक असतात. उच्च विचार दर्शवणारी रास आहे. नवम स्थानाची द्योतक असल्यामुळे सहजगत्या यांचा भाग्योदय होतो. उत्तम आत्मविश्वास, धडाडी , क्षत्रियता या गोष्टी आपल्यात आहेत.

या राशीचे चिन्हच योद्धा आहे त्यामुळे क्षत्रिय धर्माची ही रास आहे. तरीसुद्धा गुरू स्वामी असल्यामुळे यांच्या स्वभावामध्ये प्रामाणिकपणा, मोकळेपणा, मनाचा मोठेपणा, दिलदारपणा, स्पष्टवक्ता हे गुण दिसून येतात. खूप काही गोष्टी उदार, महान गोष्टी करू शकतात. समजुतदारपणा आणि इतरांचे भलं करण्याची प्रवृत्ती असते.

शिक्षणासाठी पोषक असणारी रास आहे. स्वतः ज्ञान मिळवेल आणि इतरांना ते पटवून देण्याची प्रवृत्ती यांच्याकडे आहे. नवीन नवीन गोष्टी शिकणे आणि ज्ञानाकडे झेपण्यासाठी उत्सुकता यांची कायमच अबाधित असते. जसे की आपण म्हणतो "शहाणे करून सोडावे सकळ जन". हे लोक त्यांच्या उत्तम गोष्टीवर अध्यात्म, श्रद्धा, नीती याच्यावर पुढे जाऊ शकतात.

Dhanu Rashi Bhavishya Today
Kanya Rashi Personality : कन्या राशीच्या लोकांमध्ये असतात १० खास गोष्टी; इतरांना करतात प्रभावित, जाणून घ्या

कायमच आशावाद, पुढचा विचार आणि उत्साह ठासून भरलेला असतो. समाजाचे भलं करणं, विशाल ध्येय ठेवणं, आपल्या जुन्या चालीरीतीने रूढी परंपरा सांभाळणं यामध्ये मोठ्यांचा ऐकण्यामध्ये असतात.

गुरु चांगला असेल तर अनेक गोष्टी सुखाच्या संधी यांना सहज मिळतात. काही वेळेला कोरडेपणा, स्वतःला मोठे समजणे, बडेजाव, अध्यात्मिक अहंकार, गर्व, स्वार्थी, स्वतःची टीमकी वाजवणे, मीपणा, चिडचिडेपणा, संधी साधूपणा आव म्हणून नको ते करणारे या गोष्टीचे दुर्गुण या लोकांमध्ये आहेत. काही अंशी इतरांना ज्ञान पाजण्यात जन्म जातो.

द्विस्वभाव रास असल्यामुळे पटकन निर्णय न घेता येणे. पण भटकंती आवडते. या राशीचे लोक तुम्हाला कन्सल्टंट, गाईड, ॲडव्हायझर, ट्रेनर, शिक्षक, अधिकार पदावर सुद्धा नोकरी करताना आढळून येतात. आजारांचा विचार केला तर मांडीतील स्थायू, हाडे यांच्यावर अंमल आहे. उष्णतेचे आजार होऊ शकतात.

गुडघे हाडांची दुखणी, खाण्यापिण्यापासून होणारे रोग, डायबेटिस, अपचन यकृताचे विकार, रक्ताचे विकार होऊ शकतात. उपासना -सद्गुरूंची उपासना दत्तगुरूंची उपासना विशेष फलदायी ठरते. जप श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ करावा

Dhanu Rashi Bhavishya Today
Rashi Bhavishya : मेषसह 4 राशींच्या लोकांना रविवारी होतील मोठे लाभ, तुमची रास?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com