Todays Horoscope: आत्मविश्वास वाढेल, कुटुंबात मतभेद होईल; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

आजचे राशीभविष्य जाणून घ्या आणि आपल्या दिवसाची सुरुवात योग्य नियोजनाने करा. करिअर, आर्थिक स्थिती, कुटुंब आणि आरोग्याबाबत प्रत्येक राशीसाठी काय सांगतात ग्रह, वाचा सविस्तर भविष्य.
Today Horoscope in Marathi
Today HoroscopeSaam tv
Published On

मेष

आज तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला दिसेल आणि त्यामुळे कामाच्या ठिकाणी महत्त्वाच्या संधी मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. कुटुंबासोबत आनंदी क्षण घालवण्याची संधी मिळेल.

वृषभ

आजचा दिवस संयमाने हाताळावा लागेल कारण काही कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. खर्च वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबात थोडे मतभेद होऊ शकतात. त्यामुळे शांतपणे निर्णय घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

Today Horoscope in Marathi
Mangal Gochar: 23 फेब्रुवारीपासून या राशींच्या सर्व इच्छा होणार पूर्ण; मंगळ गोचरमुळे करियरमध्येही होणार प्रगती

मिथुन

आज तुमच्या नवीन कल्पनांना योग्य दिशा मिळेल. त्यामुळे करिअरमध्ये प्रगतीची चांगली संधी मिळेल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि मित्रांची साथ लाभेल.

कर्क

आज तुम्ही भावनिक निर्णय घेण्यापासून दूर राहणं गरजेचं आहे. त्यामुळे कामावर परिणाम होऊ शकतो, आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.

सिंह

आज तुमचे नेतृत्वगुण सर्वांसमोर उठून दिसतील आणि त्यामुळे कामात यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे.

कन्या

आज तुम्ही कामात खूप व्यस्त राहाल पण त्यातून तुम्हाला चांगला आर्थिक फायदा मिळेल. कुटुंबात शांतता राहील आणि आरोग्य ठीक राहणार आहे. तसंच काही नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.

तूळ

आज तुम्हाला प्रत्येक गोष्टीत संतुलन राखणे महत्त्वाचे ठरेल कारण त्यामुळे कामात प्रगती होईल. आर्थिक लाभ मिळणार आहे. कुटुंबात आनंद टिकून राहील आणि मित्रांची मदतही वेळोवेळी मिळत राहील.

वृश्चिक

आज काही गुप्त गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे ज्यामुळे थोडा ताण येऊ शकतो. कामात मात्र यश मिळणार आहे. आर्थिक स्थिती सुधारेल आणि मित्रांची साथ तुम्हाला स्थिर ठेवेल.

Today Horoscope in Marathi
Navpancham Rajyog: नवपंचम राजयोगाने या राशींचं नशीब रातोरात पालटणार; सूर्य आणि गुरु देणार भरभरून पैसा

धनु

आज तुमच्यातील उत्साह वाढलेला दिसणार आहे. त्यामुळे कामात यश मिळणार आहे. आर्थिक लाभ होणार आहे. प्रवास फायदेशीर ठरेल आणि नवीन संधी तुमच्यासमोर येतील.

मकर

आज तुमच्यावर जबाबदाऱ्या वाढतील पण तुम्ही त्या यशस्वीपणे पार पाडाल. कामात प्रगती होईल आणि आर्थिक स्थिती स्थिर राहील. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल आणि संयम ठेवणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे.

Today Horoscope in Marathi
Shukra Nakshatra Gochar: 11 फेब्रुवारी रोजी शुक्र करणार राहूच्या नक्षत्रात प्रवेश; नशीब झपाट्याने बदलून हाती येणार पैसा

कुंभ

आज तुम्ही काही नवीन योजना सुरू करण्याचा विचार कराल ज्यामुळे कामात प्रगती होईल. कुटुंबात आनंद राहील आणि मित्रांचे सहकार्य तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

मीन

आज तुमची कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता वाढलेली दिसेल त्यामुळे कामात यश मिळेल. मित्रांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com