Mangal Gochar: 23 फेब्रुवारीपासून या राशींच्या सर्व इच्छा होणार पूर्ण; मंगळ गोचरमुळे करियरमध्येही होणार प्रगती

ज्योतिषशास्त्रानुसार २३ फेब्रुवारीपासून मंगळ ग्रहाचे संक्रमण होत आहे. या संक्रमणामुळे काही राशींना विशेष लाभ मिळणार असून त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होईल.
Mangal Gochar
Mangal Gocharsaam tv
Published On

ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ हा भूमी, शौर्य, धैर्य, क्रोध यांचा कारक मानला जातो. त्यामुळे ज्यावेळी मंगळाच्या हालचालीत बदल होतो तेव्हा या क्षेत्रांवर विशेष परिणाम होतो. ग्रहांचा सेनापती मंगळ २३ फेब्रुवारी रोजी शनीच्या अधिपत्याखालील कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.

मंगळ ग्रहाच्या गोचरमुळे काही राशींचे अच्छे दिन सुरु होणार आहेत. याव्यतिरिक्त संपत्ती आणि मालमत्तेत वाढ होण्याची शक्यता आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

Mangal Gochar
Auspicious Day Zodiac Signs: चंद्रदेवाच्या आशिर्वादाने आजचा दिवस ठरणार खास; या राशींना मिळणार शुभ परिणाम

कुंभ रास

मंगळाचे भ्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे . मंगळ तुमच्या राशीपासून लग्नात भ्रमण करतोय. या काळात तुमचे धैर्य वाढणार आहे. तुमचा आत्मविश्वासही उंचावलेला राहणार आहे. विवाहित जोडप्यांना आनंदी वैवाहिक जीवन अनुभवायला मिळणार आहे. तुमच्या जोडीदाराचीही प्रगती होऊ शकते.

मिथुन रास

मिथुन राशीतील मंगळाचं गोचर या राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. मंगळ तुमच्या राशीतून तुमच्या नशिबात प्रवेश करणार आहे. तुम्हाला नशीबाची साथ मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही देशात किंवा परदेशात प्रवास देखील करू शकता. गुंतवणूक आणि नवीन योजना देखील फायदेशीर ठरतील.

Mangal Gochar
Rajyog: 100 वर्षांनंतर हनुमान जयंतीला बनणार बुधादित्य-लक्ष्मी नारायण योग; 'या' राशींच्या व्यक्ती होणार मालामाल, 3 ग्रहांची राहणार कृपा

वृषभ रास

मंगळाचं गोचर तुमच्यासाठी शुभ ठरू शकणार आहे. मंगळ तुमच्या राशीतून कर्मभावात भ्रमण करणार आहे. या काळात तुमच्या कामात आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. या काळात बेरोजगार लोकांना नोकऱ्या मिळू शकतात. व्यावसायिकांना लक्षणीय आर्थिक लाभ होऊ शकतो.

Mangal Gochar
Panchgrahi Yog: 11 दिवसांनंतर या राशींना मिळणार पैसाच पैसा; पंचग्रही राजयोगामुळे लक्ष्मी येणार दारी

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com