Friday Horoscope : भावंडाचा भर भक्कम पाठिंबा मिळेल, परिस्थितीशी दोन हात कराल; ५ राशींचे लोक प्रगतीपथावर वाटचाल करतील

Friday Horoscope in marathi : आज काही राशींच्या लोकांना कुटुंबीयातील सदस्यांकडून पाठिंबा मिळेल. तर काही जणांना परिस्थितीशी दोन हात करावे लागेल. वाचा शुक्रवारचं राशीभविष्य
Rashi Bhavishya
Horoscope Today in Marathi Saam tv
Published On

आजचे पंचांग

शुक्रवार,११ जुलै २०२५,आषाढ कृष्णपक्ष.

तिथी-प्रतिपदा २६|०९

रास-धनु १२|०९ नं. मकर

नक्षत्र-उत्तराषाढा (अहोरात्र)

योग- वैधृति

करण-बालव

दिनविशेष-वैधृति वर्ज्य

मेष - घराचे व्यवहार करत असाल तर आज जपून करावेत. देवाने भाग्यामध्ये अनेक गोष्टी दिल्या आहेत. पण त्या घेण्याची आपली पात्रता असावी. गणेश उपासना विशेष फलदायी ठरणार आहे. लांबचे प्रवास घडतील.

वृषभ - कधी कधी अति हव्यास आणि मनासारख्या गोष्टी करण्यासाठी अट्टाहास असणारी आपली रास आहे. आयुष्यामध्ये मजा करण्यासाठी कुठल्याही टोकाला जाऊ शकता. आज मात्र या आपल्या स्वभावाला आवर घालण्याची गरज आहे.

मिथुन - व्यावसायिक जोडीदार घरातील जोडीदार भावंडांचा आपल्याला चांगलाच पाठिंबा राहणार आहे. मनाने ठरवाल त्या गोष्टी आज लीलाया घडतील. कोर्टाच्या कामांमध्ये यश मिळेल.

Rashi Bhavishya
Kitchen Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार रात्री किचनमध्ये खरकटी भांडी का ठेवू नयेत?

कर्क - अति भावनिकता आणि साधेपणा कधी कधी अडचणीचे ठरतो. आज मात्र आपला कोण आणि परक कोण हे ओळखून मागण्याचा दिवस आहे. विनाकारण ताणतणाव वाढतील. काळजी घ्या.

सिंह - रवी उपासना विशेष फलदायी ठरेल. आपल्यामधील नवनवीन शिकण्याच्या गोष्टींना आज उभार येईल. वेगळे काहीतरी जगावेगळे करून दाखवण्याची उमेद आज राहील. धन योगाला दिवस उत्तम आहे.

कन्या - सर्वांना जोडून ठेवण्याचे आज काम आपल्याकडून होईल. कुटुंबीय आपला आज वेगळा महत्त्वाच्या गोष्टींसाठी सल्लाही घेतील. बौद्धिक गोष्टींमध्ये अग्रेसर राहाल. जागेचे व्यवहार होतील.

Rashi Bhavishya
Vastu Tips: घरात नवीन वस्तू आणताच कुठे ठेवाव्यात? जाणून घ्या योग्य दिशा

तूळ - बेबनाव आपल्याला आवडत नाही. आज सचोटीने कामे कराल. एक वेगळी जिद्द आणि उमेदीने भरलेला दिवस असेल. न ठरवता सुद्धा काही गोष्टी सहज घडतील. भावंडांना आपल्याविषयी अभिमान वाटेल.

वृश्चिक - जबाबदारीने घरातील कामे तुम्हाला आज पार पाडावी लागतील. कुठेही उगीच घाई करून चालणार नाही. वडिलोपार्जित संपत्तीशी निगडित महत्त्वाचे व्यवहार किंवा निर्णय आज होतील.

धनु - देवाने दिले आहे त्यामध्ये आनंद मानाल. एक वेगळी ऊर्जा आणि आभा घेऊन आज वावराल . काही वेळेला दोलायमान अवस्था होईल. निर्णय घेण्यात आज गडबड करू नका.

Rashi Bhavishya
Vastu Shanti Puja: घरात वास्तुशांती पूजा करताना या गोष्टी टाळाच, नाहीतर होईल नुकसान

मकर - जुन्या गोष्टी उकरून काढून विशेष काही फरक होणार नाही. उगाचच मानसिकता आपली अस्वस्थ राहील. आलेल्या परिस्थितीशी आज दोन हात करा आणि आपले मनोबल सांभाळा.

कुंभ - वायुतत्वाची असणारी आपली रास संशोधनात्मक कार्यात आज प्रगती होईल. प्रेमामध्ये यश मिळेल जवळच्या लोकांच्याकडून शाबासकीची पाठीवर थाप पडेल. दिवस आनंदी आहे.

मीन - कर्माला प्राधान्य देऊन आज वागाल तर दुप्पट चांगली फलित मिळतील. राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये काहीतरी ध्येय ठेवून आज तुम्ही वागाल. प्रगतीपथावर वाटचाल होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com