Sunday Horoscope: कामात यश, पण आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका! या ५ राशींच्या व्यक्तीचा खर्च वाढणार

Daily Horoscope: आजच्या राशिभविष्यानुसार काही राशींना करिअरमध्ये प्रगती, आर्थिक लाभाचे संकेत आहेत. मात्र आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.
Horoscope
Horoscope in MarathiSaam tv
Published On

१ मार्च हा रविवार असून या दिवशी सूर्यदेवांची पूजा करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. ज्योतिष गणनेनुसार काही राशींना लाभदायक दिवस ठरणार आहे, तर काहींना सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे.

मेष - कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. आर्थिक स्थिती सुधारेल, मात्र थकवा जाणवू शकतो म्हणून पुरेशी विश्रांती घ्या.

वृषभ - आज कामाचा ताण वाढू शकतो, पण संयम ठेवल्यास सर्व सुरळीत पार पडेल. महत्त्वाच्या निर्णयांमध्ये घाई करू नका. पोटाशी संबंधित त्रास संभवतो, त्यामुळे आहाराची काळजी घ्या.

मिथुन - आत्मविश्वासात वाढ होईल आणि नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत. आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहील.

कर्क - भावनेच्या भरात मोठे निर्णय घेणे टाळा. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. छाती किंवा श्वासाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

सिंह - कार्यक्षेत्रात तुमचे नेतृत्व कौतुकास्पद ठरेल. पदोन्नती किंवा नवीन संधी मिळण्याचे योग आहेत. प्रेमसंबंधात गोडवा टिकेल आणि आरोग्यासाठी व्यायाम आवश्यक आहे.

कन्या - आज जबाबदाऱ्या वाढतील, पण मेहनतीचे योग्य फळ मिळेल. उत्पन्न वाढण्याचे संकेत आहेत. मात्र वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

Horoscope
Lapwing Bird: झाडावर न बसणाऱ्या टिटव्या कुठे राहतात अन् काय खातात? जाणून घ्या सत्य

तुळ - कामाची धावपळ वाढेल, त्यामुळे वेळेचे नियोजन महत्त्वाचे ठरेल. त्वचेच्या किरकोळ तक्रारी संभवतात. स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.

वृश्चिक - भावनांपेक्षा विचारपूर्वक निर्णय घेणे फायद्याचे ठरेल. करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. डोकेदुखीचा त्रास संभवतो, त्यामुळे तणाव टाळा.

धनु - नवीन योजना सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जास्त कामामुळे थकवा येऊ शकतो.

मकर - मेहनतीचे फळ मिळेल आणि वरिष्ठांकडून कौतुक होईल. धनलाभाचे योग आहेत. तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.

कुंभ - कामानिमित्त प्रवासाचे योग संभवतात. कंबर किंवा सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो. विश्रांती आणि योग्य व्यायाम आवश्यक आहे.

मीन - शांतपणे विचार करून निर्णय घेतल्यास यश मिळेल. कामात नवी दिशा मिळण्याचे संकेत आहेत. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल, थंड पदार्थ टाळा.

डिस्क्लेमर - या लेखातील माहिती ज्योतिषीय गणनांवर आधारित आहे. ती पूर्णपणे अचूक असेलच असा दावा नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Horoscope
Sarees Store Tips: महागड्या साड्यांची वर्षानुवर्षे निगा राखायचीये? तर कपाटात ठेवण्यापूर्वी या 5 गोष्टी लक्षात ठेवा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com