Sakshi Sunil Jadhav
टिटव्या अनेकदा, मैदानात, शेतात किंवा पाणथळ जागेवर फिरताना दिसतात. झाडावर बसलेल्या टिटव्या तुम्ही पाहील्याच नसतील.
टिटव्या दिसणं किंवा दारासोबत ओरडणं खूप अशुभ मानलं जातं. बऱ्याचदा लोक टिटव्या ओरडल्या म्हणजे काहीतरी अनर्थ होणार असं म्हणतात.
टिटवीला शास्त्रीय नाव आणि ओळख आहे. त्यात तिचं नाव Vanellus indicus आहे. डोळ्यांजवळ लाल मांसल गाठी (wattle) आणि काळ्या-तपकिरी रंगामुळे ती सहज ओळखता येते.
टिटव्या उडतात, पण त्या झाडावर सहसा बसत नाहीत. बहुतेक वेळ जमिनीवरच फिरताना किंवा अन्न शोधताना दिसतात.
टिटव्या प्रामुख्याने भारतासह दक्षिण आशियात आढळतात. ती मोकळी मैदानं, शेतात, नदी-तलाव किनाऱ्यांजवळ आणि पाणथळ प्रदेशात टिटव्या राहताना दिसतात.
इतर पक्ष्यांप्रमाणे झाडांवर घरटे न बांधता टिटवी जमिनीवर, गवताच्या झुडपात किंवा दगडाजवळ साधं घरटे तयार करतात आणि राहतात.
या पक्ष्याचा आवाज हा 'टिवटिव टिव टिव' असतो. जसं की, इंग्रजीत तिला “Did-he-do-it bird” असंही म्हटलं जातं.
टिटव्यांची लांबी साधारण ३२ ते ३५ सेंमी असते आणि वजन सुमारे २०० ते २५० ग्रॅम असते.
कीटक, अळ्या, लहान सरपडणारे किटक प्राणी हे तिचे मुख्य अन्न आहे. त्यामुळे शेतीसाठीही ती फायदेशीर मानली जाते.
टिटवीला पाणथळ भाग आवडतो. काही वेळा ती पंख पाण्यात भिजवून पिल्लांना थंडावा देताना दिसतानाही पाहायला मिळते.