

मेष : महत्त्वाच्या कामांमध्ये घाई करू नका. खर्चावर नियंत्रण ठेवून नियोजन केल्यास फायदा होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल आणि गुंतवणुकीत विचारपूर्वक निर्णय घ्या.
वृषभ : कामाच्या ठिकाणी शिस्त आणि मेहनतीमुळे चांगले परिणाम मिळतील. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील.
मिथुन : करिअर आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत.
कर्क : कामकाजात चांगले परिणाम मिळतील. सहकारी आणि मित्रांचे सहकार्य लाभेल. व्यावसायिक संबंध अधिक मजबूत होतील.
सिंह : महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका. आर्थिक व्यवहार स्पष्टपणे करा. कुटुंबीयांचा सल्ला घेतल्यास अडचणी टाळता येतील.
कन्या : वैवाहिक जीवनात विश्वास वाढेल. भागीदारीच्या कामांमध्ये चांगली प्रगती होईल. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात.
तुळ : करिअरमध्ये संमिश्र परिस्थिती राहील. नवीन व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नका. मेहनतीच्या जोरावर यश मिळेल.
वृश्चिक : घरात आनंदाचे वातावरण राहील. सर्जनशील कामांमध्ये यश मिळेल. मित्रांच्या सहकार्यामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील.
धनु : भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. संयमाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. बोलण्यातील प्रभावामुळे कामे सोपी होतील.
मकर : व्यावसायिक कामांना गती मिळेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. समाजात तुमचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.
कुंभ : आर्थिक बाबींमध्ये चांगली प्रगती होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. बचतीवर भर दिल्यास भविष्यासाठी फायदा होईल.
मीन : आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलतील. महत्त्वाची कामे यशस्वी होतील. सर्जनशीलतेमुळे नवीन संधी मिळतील.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.