Microsoft Layoffs google
बिझनेस

Microsoft ने 4,800 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं; नोकरकपातीचा निर्णय का घेतला?

Microsoft ने ४८०० कर्मचाऱ्यांची कपात करत व्यवयात पुनर्रचनेला गती दिली आहे. AI मुळे नव्हे तर बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

Sakshi Sunil Jadhav

जगातली आघाडीची तंत्रज्ञान कंपनी Microsoft ने नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच मोठा निर्णय घेत ४.८०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे. ही संख्या कंपनीच्या एकूण जागतिक कर्मचाऱ्यांच्या सुमारे २.१ टक्के आहे.

कंपनीच्या Chief People Officer एमी कोलमन (Amy Coleman) यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये सांगितलं की, तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने बदलत असल्यामुळे कंपनीलाही आपल्या कामकाजात बदल करणं आवश्यक आहे. त्यामुळे व्यवसायाच्या गरजेनुसार काही विभागांमध्ये पुनर्रचना करण्यात येत आहे.

तर कंपनीच्या या कपातीचा सर्वात जास्त परिणाम Commercial आणि Xbox विभागांवर झालेला आहे. Xbox विभागात चार गेमिंग स्टुडिओ नवीन व्यवस्थापनाखाली काम करणार आहेत. त्याने कंपनीच्या सुरू असलेल्या प्रकल्पांचे आणि बौद्धिक संपत्तीचे संरक्षण करता येईल.

एमी कोलमन यांनी स्पष्ट केलं की, या कर्मचाऱ्यांच्या जागी AI आणलं जात नाही. पण AI मुळे काम करण्याची पद्धत बदलली आहे. कर्मचाऱ्यांनी नवीन स्कील्स शिकणे आणि बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे गरजेचे आहे. कंपनीने सांगितलं की, कर्मचारी कमी करण्याआधी त्यांना दुसऱ्या योग्य पदावर नियुक्त करण्याचा प्रयत्न केला जातो.

गेल्या एका वर्षात ४००० हून जास्त कर्मचाऱ्यांना नवीन पदं देण्यात आली, त्यातल्या ५०० जणांना याच महिन्यात बदली करण्यात आली. पण कंपनीने हेही स्पष्ट केलं की ही पुनर्रचना इथेच थांबणार नाही. पुढच्या काही महिन्यांत इतर विभागांमध्येही अशाच प्रकारचे बदल होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षीही Microsoft ने सुमारे ९१०० कर्मचाऱ्यांची कपात केले होते. आता पुन्हा ४८०० कर्मचाऱ्यांना कमी करून कंपनी बदलत्या तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या गरजांनुसार स्वतःला जास्त सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत आहे. शेवटी, एमी कोलमन यांनी उरलेल्या कर्मचाऱ्यांना आवाहन केलं की, कंपनी सोडणाऱ्या सहकाऱ्यांना नवीन नोकरी मिळवण्यासाठी शक्य ती मदत करावी आणि आपल्या संपर्कांचा उपयोग करून त्यांना नवीन संधी उपलब्ध करून द्याव्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मुन्नाभाई MBBS' फेम बॉलिवूड अभिनेत्याच्या कारचा गोव्यात भीषण अपघात; बाप-लेकाला उडवलं, VIDEO व्हायरल

Appendix cancer: पोट फुगीमागे लपलाय अपेंडिंक्सचा कॅन्सर? 'ही' 5 लक्षणं दिसली तर समजा सुरुवात झालीये

UGC NET 2026: ३ विषयांची फेरपरीक्षा होणार; प्रश्नपत्रिकेतील गोंधळानंतर NTA ची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून नवीन विमानसेवेची प्रतीक्षा

Hotel Fire : झोपेतच काळाचा घाला! श्रावण सोमवारी मंदिराबाहेरील प्रसिद्ध हॉटेलमध्ये आग, ६ जण जिवंत जळाले अन्

SCROLL FOR NEXT