PF interest: PF खातेदारांसाठी मोठी खुशखबर! EPFO चा नवा आदेश, लवकरच खात्यात जमा होणार व्याज

EPFO interest rate : केंद्र सरकारने २०२५-२६ साठी ईपीएफवरील ८.२५% व्याजदराला मंजुरी दिली आहे. त्यामुळे ८ कोटींहून जास्त पीएफ खातेदारांच्या खात्यात लवकर व्याज जमा होणार असून प्रक्रिया यंदा जास्त वेगाने पूर्ण होणार आहे.
PF Interest Rate
PF Interest RateGOOGLE
Published On
Summary

कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

केंद्र सरकारने व्याजदराला दिली अंतिम मंजुरी

८ कोटी खात्यात व्याज जमा

नोकरी करणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ही रिटायरमेंटनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेची सर्वात विश्वासू बचत योजना मानली जाते. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ८.२५ टक्के व्याज ठेवण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर आता देशातल्या ८ कोटी ईपीएफ खातेदारांच्या खात्यात व्याजाची रक्कम लवकरच जमा होणार आहे.

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून मंजुरी मिळल्यावर ईपीएफओने देशभरातल्या सर्व प्रादेशिक कार्यालयांना सदस्यांच्या खात्यात ८.२५ टक्के दराने व्याज जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. हे व्याज आर्थिक वर्ष २०२५-२६ दरम्यान कर्मचारी आणि नियोक्त्यांनी जमा केलेल्या रकमेवर लागू होणार आहे. विशेष म्हणजे, सलग तिसऱ्या वर्षी ईपीएफचा व्याजदर ८.२५ टक्के कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंट निधीत चांगली वाढ होणार आहे.

PF Interest Rate
Blood Sugar : रक्तातली साखर वाढल्यावर दिसतात ही 8 लक्षणे, वेळीच ओळखा धोक्याचा इशारा

महत्त्वाची बाब म्हणजे, व्याज जमा होण्याची प्रक्रिया याआधीपेक्षा जास्त वेगाने पूर्ण होण्याची शक्यता आहे. नुकतच ईपीएफओने त्यांची डेटाबेस प्रणाली आणि सॉफ्टवेअरचे आधुनिकीकरण पूर्ण केलं आहे. त्यामुळे पूर्वीसारखं टप्प्याटप्प्याने बरेच आठवडे वाट पाहावी लागणार नाही. बऱ्याच खातेदारांच्या खात्यात व्याजाची रक्कम जास्त जलद जमा होण्याची अपेक्षा आहे.

यंदाच्या मार्च महिन्यात ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने २०२५-२६ साठी ८.२५ टक्के व्याजदराला मंजुरी दिली होती. त्यानंतर हा प्रस्ताव वित्त मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. जून २०२६ मध्ये अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर आता व्याज खात्यात जमा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

PF Interest Rate
EPFO चा मोठा निर्णय! २ जुलैपर्यंत PF क्लेम आणि पासबुक डाउनलोड पूर्णपणे बंद, वाचा संपूर्ण माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com