Vastu Tips: महिन्याच्या शेवटी खिशात पैसा राहात नाही? आजच करा हे ५ सोपे उपाय; कधीही भासणार नाही पैशांची चणचण

Vastu Tips for Money: महिन्याच्या शेवटी खिशात पैसे टिकत नाहीत? जाणून घ्या घरातील कोळ्याची जाळी, भिंतींचे तडे, सुकलेली झाडे आणि मुख्य प्रवेशद्वाराशी संबंधित ५ सोपे वास्तु उपाय. आर्थिक बचतीसाठी महत्त्वाच्या टिप्सही वाचा.
Vastu Tips for Money
Vastu Tips for MoneySaam TV
Published On: 

खूप मेहनत करूनही महिन्याच्या शेवटी खिशात पैसा राहातच नाही. अहोरात्र कष्ट करूनही जर तुमच्या हातात पैसा टिकत नसेल, तर यामागचे कारण फक्त तुमची आर्थिक स्थिती नाही तर घरातील वास्तू दोष असू शकतो. घरात नकळत केलेल्या छोट्या-छोट्या चुकांमुळे लक्ष्मीची कृपा टिकत नाही. पण काळजी करू नका, ५ अत्यंत सोपे वास्तू उपाय केल्यावर तुमची पैशांची चणचण कायमची संपेल. माता लक्ष्मीची तुमच्यावर सदासर्वकाळ कृपा राहील. जाणून घ्या नेमके काय करायला हवे...

कोळ्याची जाळी नियमित साफ करा

घर किंवा दुकानातील कोपऱ्यांमध्ये कोळ्याची जाळी असणे अशुभ मानले जाते. त्यामुळे घरात नकारात्मकता वाढू शकते आणि आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे घरातील छत, दारांमागील जागा आणि कोपरे आवर्जून स्वच्छ ठेवा. दुकानातही ज्या भागांची सहसा स्वच्छता होत नाही, तिथे साफसफाई कराच. स्वच्छ वातावरणामुळे घर तर नीटनेटके राहतेच त्याशिवाय दैनंदिन कामेही अगदी सुरळीत पार पडतात.

भिंतींचे तडे आणि डाग लवकरात लवकर दुरुस्त करा

तुमच्या घरात भिंतींना तडे गेले असतील किंवा रंग निघत असेल तर त्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. वास्तुशास्त्रानुसार, भिंतींची खराब स्थिती अशुभ मानली जाते. त्यामुळे वेळेत भिंतींची दुरुस्ती करून त्यांना व्यवस्थित रंगरंगोटी करून घ्या. जर भिंतींमध्ये ओलसरपणा किंवा तडे असतील तर त्याचे मूळ कारण शोधून ती समस्या तातडीने सोडवून घेणे फायद्याचे ठरते.

Vastu Tips for Money
नाशिकमध्ये नवरात्रोत्सवात काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

झाडांवरील वाळलेली पाने वेळच्या वेळी काढा

घरी किंवा दुकानात शोभेची किंवा इतर झाडे लावली असतील, तर त्यांची योग्य निगा राखणे गरजेचे असते. वास्तुशास्त्रानुसार हिरवीगार व टवटवीत झाडे शुभ मानली जातात, तर सुकलेली किंवा कोमेजलेली झाडे अशुभ ठरतात. त्यामुळे झाडांची नियमित पाहणी करून त्यावरील वाळलेली पाने काढून टाकावीत. झाडांना वेळेवर पाणी द्या आणि त्यांना सूर्यप्रकाशाची चांगली सोय असलेल्या ठिकाणी ठेवा. एखादे झाड पूर्णपणे सुकून गेले असेल, तर ते काढून तिथे नवीन आणि टवटवीत झाड लावावे.

घराभोवती वटवाघळांना थारा देऊ नका

वास्तुशास्त्रानुसार घराच्या किंवा दुकानाच्या आसपास वटवाघळांचे वास्तव्य असणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात आर्थिक आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात, असा समज आहे. जर तुमच्या घराच्या छतावर, बाल्कनीत किंवा इतर कोणत्याही मोकळ्या भागात वटवाघळे सतत येत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. मात्र, त्यांना स्वतःहून पकडण्याचा किंवा इजा पोहोचवण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. आवश्यकता भासल्यास त्यांना सुरक्षितपणे दूर हटवण्यासाठी वन्यजीव विभागाची (फॉरेस्ट डिपार्टमेंट) किंवा प्रशिक्षित तज्ञांची मदत घ्यावी.

Vastu Tips for Money
अमरावतीत भीषण अपघात! हायड्रा क्रेनने ५ जणांना उडवले; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

घराचे मुख्य प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ ठेवा

वास्तुशास्त्रामध्ये घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला विशेष स्थान आहे. हे सकारात्मक ऊर्जेचे मुख्य द्वार मानले जाते. त्यामुळे दाराच्या आसपास कचरा, नकोशा वस्तू किंवा धूळ साचू देऊ नका. मुख्य प्रवेशद्वार नियमितपणे स्वच्छ ठेवा आणि येण्या-जाण्याच्या मार्गात कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी घ्या. प्रवेशद्वार स्वच्छ आणि नीटनेटके असल्यामुळे घराचे सौंदर्य तर वाढतेच, शिवाय ये-जा करणेही अगदी सुलभ होते.

तुटलेल्या आणि निरुपयोगी वस्तू घरात किंवा दुकानात साठवू नका

न वापरलेल्या किंवा तुटलेल्या वस्तू दीर्घकाळ घरात किंवा दुकानात टाकून ठेवणे योग्य नाही. वास्तूनुसार अशा वस्तू नकारात्मकतेशी जोडल्या जातात. त्यामुळे वेळोवेळी खराब झालेली भांडी, फुटलेली पातेली किंवा इतर न वापरल्या जाणाऱ्या वस्तू बाहेर काढून टाका. ज्या वस्तू दुरुस्त करून पुन्हा वापरता येतील, त्या सुधारा आणि बाकीच्या फेकून द्या. यामुळे जागा मोकळी होईल आणि घर किंवा दुकान नीटनेटके ठेवणे सोपे जाईल.

पैशांची बचत करण्यावरही द्या विशेष भर

फक्त वास्तू उपायांवर अवलंबून न राहता तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उत्पन्नाचा आणि खर्चाचा ताळमेळ ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कधीकधी चांगले उत्पन्न असूनही, अनावश्यक खर्चामुळे पैसा हातात टिकत नाही. त्यामुळे दरमहा आवश्यक खर्च आणि बचतीसाठी वेगळी रक्कम बाजूला काढून ठेवा. घराची स्वच्छता आणि दुरुस्ती यावर लक्ष केंद्रित करण्यासोबतच एक योग्य आर्थिक नियोजन तयार करा.

(टीप: वरील माहिती उपलब्ध माहितीनुसार देण्यात आली आहे. यातील माहिती पूर्णपणे अचूक असल्याचा आमचा दावा नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Vastu Tips for Money
Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com