Shukraditya Rajyog: उद्या बनणार पॉवरफुल शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींचा पैसा आणि संपत्ती दुप्पटीने वाढणार

Shukraditya Rajyog 2026: ज्योतिषशास्त्रानुसार उद्या एक विशेष शुक्रादित्य राजयोग तयार होत आहे. सूर्य आणि शुक्र यांच्या संयोगामुळे हा योग निर्माण होतो.
Shukra Grah
Shukra Grah Astro Tare
Published On

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सणांमध्ये ग्रहांचं गोचर वेळोवेळी शुभ राजयोग निर्माण करतात. या वर्षी मकर संक्रांत १४ जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सूर्य आणि शुक्राच्या युतीमुळे शुक्रादित्य राजयोग निर्माण होणार आहे.

शुक्रादित्य राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींना सौभाग्य मिळू शकणार आहे. या राशींना अनपेक्षित आर्थिक लाभ आणि भाग्य वाढण्याची शक्यता आहे. यावेळी कोणत्या राशींवर देवाची कृपा असणार आहे ते पाहूयात.

Shukra Grah
Mahalaxmi Rajyog: 100 वर्षांनंतर तयार होतोय महालक्ष्मी राजयोग; या राशींचं भाग्य उजळून तिप्पट मिळणार पैसा

धनू रास

शुक्रादित्य राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. हा राजयोग तुमच्या राशीच्या धनस्थानात तयार होणार आहे. या योगाच्या प्रभावामुळे नोकरीत बढती आणि पगारवाढीच्या संधी उपलब्ध होतात. वडिलोपार्जित मालमत्तेतून फायदा होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक त्यांचे अडकलेले पैसे परत मिळवू शकणार आहेत.

मेष रास

शुक्रादित्य राजयोग तुमच्यासाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकतो. हा राजयोग तुमच्या राशीच्या कर्मभावात तयार होणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती मिळू शकणार आहे. काहींच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात व्यावसायिकांना आर्थिक लाभ होऊ शकतात.

Shukra Grah
Shadgrahi Yoga 2025: 57 वर्षांनी षडग्रही योग 'या' राशींना करणार मालामाल; 29 मार्चपासून घरात येणार पैसाच पैसा

वृषभ रास

उत्पन्न आणि गुंतवणुकीच्या बाबतीत शुक्रादित्य राजयोग तुमच्यासाठी शुभ ठरू शकणार आहे. हा राजयोग तुमच्या राशीच्या उत्पन्न आणि नफ्याच्या क्षेत्रात निर्माण होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात. ज्यांनी गुंतवणुक केलीये त्यांचा मोठा फायदा होणार आहे.

Shukra Grah
Zodiac signs: आजचा ग्रहयोग काय सांगतो? सोमवार चार राशींना देणार दिलासा

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com