Chitra Nakshatra Update : कन्या राशीचे लोक अत्यंत आकर्षक, कलावंत असतात का? जाणून घ्या सविस्तर

Chitra star characteristics : चित्रा नक्षत्र हे मंगळ ग्रहाच्या प्रभावाखाली असून, अत्यंत आकर्षक, कलावंत, प्रसन्न व्यक्तिमत्त्व असलेले लोक यामध्ये जन्म घेतात.
Chitra Nakshatra
Chitra Nakshatragoogle
Published On

चित्रा नक्षत्र

मंगळ ग्रहाच्या आमलाखाली येणारे नक्षत्र आहे. या व्यक्ती अत्यंत आकर्षक, प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या, मजबूत, प्रमाणबद्ध बांधा, श्रम आणि कष्ट करण्याची मनापासून तयारी असते. हौशी, अभिरुची, चैन करणे, कलावंत कलंदर वृत्ती, धाडसी मात्र महत्त्वाकांक्षी असतातच असे नाही. कारण धन सुख यातच रमणाऱ्या असतात.

Chitra Nakshatra
Online Satbara : ऑनलाईन सातबारा कसा बघावा ? स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

सतत प्रयोग करणारे, खर्चिक, उत्साही, संभाषण चतुर, भिन्नलिंगी व्यक्ती यांबद्दल आकर्षण, हे नक्षत्र स्त्रियांना जास्त भावते. रूप, सौंदर्य, बुद्धी, कला कौशल्य सर्वच बाबतीत स्त्रियांना उत्तम नक्षत्र आहे. या नक्षत्राच्या व्यक्तीची चिरकाल तारुणाईने बहरलेल्या दिसतात. जेवढे कठोर तेवढेच कोमलही असतात.

नोकरी व्यवसाय -

चित्रकला, नाट्यसृष्टी, छायाचित्रण, सराफी उद्योग, गायकी कला, म्युझियम, काच सामान(शोभेचे जास्त), रंगासंबंधी व्यापार उद्योग, उंची वस्त्रोद्योग, टीव्ही, रेडिओ कलाकार, कलात्मक प्रचार विभाग, सर्जन, पेट्रोलियम पदार्थ, तत्त्वज्ञान बुद्धिबळ तज्ञ असू शकतात .

रोग आजार -

हे नक्षत्र मंगळाच्या अमलाखाली असल्याने नेत्रविकार, कर्णविकार, युरिनरी इन्फेक्शन, गर्भाशयाचे विकार, त्वचा विकार, अतिकाम वृत्तीने होणारे रोग या नक्षतत्रास येतात. किडनी, कंबर, मोठे आतडे, आंत्रपुच्छ हे शरीराचे अवयव येतात.

Chitra Nakshatra
Chanakya niti : मनाने हरलेला माणूस घेईल यशाची उंच भरारी, वाचा चाणक्यांची ही चार गुपितं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com