Marathi Serial Update : तुमच्या आवडत्या मालिका नवीन वेळेत, आताच वेळापत्रक नोट करा

Marathi Serials Timing Change : मराठी मालिकांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. नवीन वेळापत्रक आताच नोट करून घ्या.
Marathi Serials Timing Change
Marathi Serial UpdateSAAM TV
Published On
Summary

'झी मराठी'च्या 3 मालिकांची वेळ बदलणार आहे.

'झी मराठी'वर नवीन दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

मालिकांचे नवीन वेळापत्रक, जाणून घेऊयात.

मराठी मालिका कायमच प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करतात. सध्या अनेक मालिकांमध्ये रंजक वळण पाहायला मिळत आहे. तसेच काही नवीन मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे चाहते मालिका पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. मात्र आता मालविका विश्वासातून मोठी अपडेट समोर आली आहे. तुमच्या आवडत्या मालिकांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.

'झी मराठी' वाहिनीने नुकतीच एक खास पोस्ट करून मालिकांच्या वेळ बदलल्याची माहिती प्रेक्षकांना दिली आहे. यात 'झी मराठी'वरील लोकप्रिय तीन मालिकांचा समावेश आहे. 'लाखात एक आमचा दादा' (Lakhat Ek Aamcha Dada) , 'सावळ्याची जणू सावली' (Savalyachi Janu Savali ) ,'पारू' (Paaru ) या मालिकांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. या तिन्ही मालिका आता तुम्हाला नवीन वेळेत पाहायला मिळणार आहे. नवीन वेळा कोणत्या जाणून घेऊयात.

मालिकांचे नवीन वेळापत्रक

  • लाखात एक आमचा दादा : 6 PM

  • सावळ्याची जणू सावली : 6.30 PM

  • पारू : 7 PM

'लाखात एक आमचा दादा', 'सावळ्याची जणू सावली','पारू' या तिन्ही मालिका वरील वेळेत 11 ऑगस्टपासून पाहायला मिळणार आहे. 11 ऑगस्टपासून दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्यामुळे वरील मालिकांची वेळ बदल्यात आली आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' आणि 'तारिणी' या दोन मालिका नव्या सुरू होणार आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'तारिणी' मालिकेत शिवानी सोनार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

नवीन मालिकांच्या वेळा

  • वीण दोघांतली ही तुटेना - 7.30 PM

  • तारिणी- 9.30 PM

Marathi Serials Timing Change
Chhaya Kadam : डायरेक्टर म्हणाला मराठीसारखं काम नाय करायचं; छाया कदमने माज जिरवला, नेमकं काय घडलं?
Q

कोणत्या मालिकांच्या वेळा बदलणार?

A

लाखात एक आमचा दादा, सावळ्याची जणू सावली ,पारू

Q

कोणत्या नवीन मालिका सुरू होणार?

A

वीण दोघांतली ही तुटेना, तारिणी

Q

मालिकांचे नवीन वेळापत्रक कधीपासून लागू होणार?

A

11 ऑगस्ट

Q

कोणत्या वाहिनीवरील मालिकांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत?

A

झी मराठी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com