Chhaya Kadam : डायरेक्टर म्हणाला मराठीसारखं काम नाय करायचं; छाया कदमने माज जिरवला, नेमकं काय घडलं?

Chhaya Kadam Experiences : मराठी , हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी अभिनेत्री छाया कदम यांनी हिंदी दिग्दर्शकाचा एक अनुभव सांगितला आहे. त्याच्या वागण्यामुळे अभिनेत्रीनं चित्रपटाचे शूटिंग थांबवले होते.
Chhaya Kadam Experiences
Chhaya Kadam SAAM TV
Published On

मराठमोळी अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam ) या कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. त्यांचा कान्स लूक पाहून चाहते घायाळ झाले होते. आजवर त्यांनी अनेक मालिका आणि कार्यक्रमात काम केले आहे. सध्या मराठी हिंदी भाषेवरुन वाद सुरू आहेत.अशात छाया कदम यांनी एका मिडिया मुलाखतीत हिंदी चित्रपटात काम करताना आलेला अनुभव सांगितला आहे.

मुलाखतीत छाया कदम म्हणाल्या की, "एका चित्रपटाच्या सेटवर दिल्लीचा दिग्दर्शक होता. तो म्हणाला, "यार वो मराठी जैसा काम नही करने का, मराठी ऍक्टर जैसा नही करने का..." असे तो 2-3 वेळा माझ्यासमोर म्हणाला. हे ऐकताच मला खूप राग आला. माझ्यातील मालवणी आणि कबड्डी खेळणारी मुलगी जागी झाली. तो असेच दुसऱ्या एका मराठी अभिनेत्रीला देखील बोलत होता. मी त्याला विचारले की, "ये आप क्या बोल रहे हो? तू आधी माफी माग...तू जिला बोलत आहेस ती मराठीतील मोठी अभिनेत्री आहे. "

पुढे छाया कदम म्हणाल्या की, "माझं असं झालं, तुला एवढा त्रास आहे तर तू मराठी सिनेमा का करतोय? हिंदीत तुला कोणी विचारलं नाही म्हणून इकडे आला ना... मग मी चित्रपटाचे शूटिंग थांबवले. मी आयुष्यात बरीच चांगली माणसे कमावली आहेत. त्यामुळे मी शूटिंग थांबवा म्हटल्यावर शूटिंग थांबेल याची मला खात्री होती. त्यानंतर चित्रपटाच्या दिग्दर्शकने माफी मागितली आणि शूटिंग सुरू झाले."

वर्कफ्रंट

छाया कदम यांनी फँड्री, सैराट असे दमदार चित्रपट केले आहे. 'लापता लेडीज'मध्ये देखील काम केले आहे. छाया कदम यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तिच्या आगामी प्रोजेक्टची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहे.

Chhaya Kadam Experiences
Saiyaara Box Office Collection : 'सैयारा'चं वादळ 'छावा'ला पछाडणार? ६ दिवसांत केली बक्कळ कमाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com