Navi Mumbai: 'मराठी बोलता है' फैझानच्या टोळक्याकडून मराठी तरूणाला मारहाण; हॉकी स्टिकनं काळंनिळं होईपर्यंत मारलं

Navi Mumbai Vashi Crime: वाशीमधील कॉलेजमध्ये मराठी भाषेत बोलल्यामुळे एका तरुणाला हॉकी स्टिकने मारहाण करण्यात आली. ही घटना संतापजनक असून परिसरात खळबळ उडाली आहे. तपास सुरू आहे.
Navi Mumbai Vashi Crime
Navi Mumbai Vashi CrimeSaam Tv News
Published On

विकास मिरगणे, साम टिव्ही प्रतिनिधी

कल्याणमध्ये परप्रांतीय तरुणाने मराठी तरुणीला रुग्णालयातच मारहाण केल्याच्या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. अशातच आता नवी मुंबईच्या वाशी परिसरातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मराठीत बोलतो म्हणून, एका तरूणाला अमराठी मुलानं हॉकी स्टिकनं मारहाण केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

वाशीमधील एका कॉलेजमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. एका मराठी तरूणाला, मराठी भाषेत बोलतो म्हणून मारहाण करण्यात आली. त्याच्याच वर्गातील फैझान नाईक या अमराठी मुलाने आणि त्याच्या मित्रांनी मारहाण केली. मारहाण करण्यासाठी त्यांनी हॉकी स्टिकचा वापर केला होता.

Navi Mumbai Vashi Crime
मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण; VIDEO व्हायरल होताच मनसैनिक आक्रमक

या भयंकर मारहाणीत तरूणाला गंभीर दुखापत झाली आहे. मारहाण झाल्यानंतर त्याला तातडीनं रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, फैझान नाईक आणि त्याचे मित्र अजूनही मोकाट असल्याची माहिती आहे. वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मात्र, अद्याप त्यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.

या घटनेनंतर मनसे प्रवक्ते आणि शहर अध्यक्ष गजानन काळे हे आज पीडित तरूणाची भेट घेणार आहेत. तसेच ११ वाजता वाशी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांची भेट घेऊन घडलेल्या घटनेवर चर्चा करणार आहेत. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास सुरू आहे.

Navi Mumbai Vashi Crime
कानात हेडफोन लावून रूळ ओलांडनं पडलं महागात, महिलेचा जागीच मृत्यू; वाचवायला गेलेल्या तरूणाचाही अंत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com