Saiyaara Box Office Collection : 'सैयारा'चं वादळ 'छावा'ला पछाडणार? ६ दिवसांत केली बक्कळ कमाई

Saiyaara Box Office Collection Day 6 : 'सैयारा'च्या गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावले आहे. सहाव्या दिवशी 'सैयारा' हाऊसफुल पाहायला मिळाला. अहान पांडेचा 'सैयारा' चित्रपट विकी कौशलच्या 'छावा'ला तगडी टक्कर देत आहे.
Saiyaara Box Office Collection Day 6
Saiyaara Box Office CollectionSAAM TV
Published On
Summary

'सैयारा' चित्रपट 18 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला आला.

अहान पांडेचा 'सैयारा' चित्रपट विकी कौशलच्या 'छावा'ला कांटे की टक्कर देत आहे.

'सैयारा'ने 150 कोटींचा टप्पा पार केला आहे.

सध्या बॉक्स ऑफिसवर 'सैयारा' या प्रेमकथेची क्रेझ पाहायला मिळत आहे. मोहित सूरी दिग्दर्शित 'सैयारा' (Saiyaara)ने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून 'सैयारा'चं शो हाऊसफुल पाहायला मिळत आहेत. 'सैयारा' चित्रपट 18 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला आला. सहा दिवसांत 'सैयारा'ने 150 कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाचे सहा दिवसांचे कलेक्शन जाणून घेऊयात.

'सैयारा' चित्रपटात अनीत पड्डा (Aneet Padda) आणि अहान पांडे (Ahaan Panday) च्या केमिस्ट्रीने चारचाँद लावले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 'सैयारा' चित्रपटाचे बजेट 40 ते 60 कोटींच्या दरम्यान आहे. 'सैयारा'ची गाणी सुपरहिट ठरली आहेत. 'सैयारा'ने टॉप 5 चित्रपटाच्या यादीत आपले स्थान मिळवले आहे. त्यामुळे भविष्यात 'सैयारा' विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाला तगडी टक्कर देणार आहे.

'सैयारा' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 6

  • पहिला दिवस - 21 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 26 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 37.75 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 24 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 25 कोटी रुपये

  • सहावा दिवस - 21 कोटी रुपये

  • एकूण - 153.25 कोटी रुपये

'सैयारा'ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

'सैयारा' नं 2025 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 5 बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. चित्रपट आता लवकरच 200 कोटींचा टप्पा पार करणार आहे. दुसऱ्या वीकेंडला चित्रपट किती कमाई करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॉप 5 चित्रपट

  • छावा - 601 कोटी रुपये

  • हाउसफुल 5 - 183 कोटी रुपये

  • रेड 2 - 173 कोटी रुपये

  • सितारे जमीन पर - 163 कोटी रुपये

  • सैयारा - 153.25 कोटी रुपये

Saiyaara Box Office Collection Day 6
Ramayana Movie : मराठमोळ्या अभिनेत्याला लॉटरी; रणबीर कपूरसोबत 'रामायण'मध्ये झळकणार, भूमिकेबद्दल व्यक्त केल्या भावना
Q

'सैयारा' कधी रिलीज झाला?

A

18 जुलै

Q

'सैयारा'चं कलेक्शन किती?

A

150 कोटींचा टप्पा पार

Q

सैयारा'चं मुख्य कलाकार कोण?

A

अनीत पड्डा-अहान पांडे

Q

'सैयारा' चं दिग्दर्शक कोण?

A

मोहित सूरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com