Shreya Maskar
'सैयारा' चित्रपट 18 जुलैला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.
चित्रपटात मुख्य भूमिकेत बॉलिवूड अभिनेत्री अनीत पड्डा आणि अभिनेता अहान पांडे झळकले आहेत.
चित्रपटातील अनीत पड्डा आणि अहान पांडेच्या केमिस्ट्रीची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे.
'सैयारा' हा रोमँटिक ड्रामा आहे. जो प्रेक्षकांना खूप आवडत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, तीन दिवसांत चित्रपटाने 83 कोटी रुपये कमाई केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'सैयारा' चित्रपटाचे बजेट 40 ते 60 कोटींच्या दरम्यान आहे.
'सैयारा' चित्रपटाच्या माध्यमातून अनीत पड्डा आणि अहान पांडे ही नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अनीत पड्डा आणि अहान पांडे यांनी 'सैयारा' चित्रपटासाठी जवळपास 3-5 कोटी रुपये मानधन घेतले आहे.