Ramayana Movie : मराठमोळ्या अभिनेत्याला लॉटरी; रणबीर कपूरसोबत 'रामायण'मध्ये झळकणार, भूमिकेबद्दल व्यक्त केल्या भावना

Adinath Kothare In Ramayana Movie : रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटात मराठमोळा अभिनेता एका महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. आपल्या भूमिकेबद्दल अभिनेता काय म्हणाला, जाणून घेऊयात.
Adinath Kothare In Ramayana Movie
Ramayana MovieSAAM TV
Published On
Summary

रणबीर कपूरचा 'रामायण' चित्रपट दिवाळीत रिलीज होणार

'रामायण' चित्रपटात मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे झळकणार आहे.

आदिनाथ कोठारे 'भरत'च्या भूमिकेत दिसणार आहे.

बहुप्रतिक्षित चित्रपट 'रामायण' (Ramayana Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'रामायण' चित्रपट दोन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग 2026च्या दिवाळीत तर 2027च्या दिवाळीत दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. 'रामायण' चित्रपटात रणबीर कपूर (राम) आणि साऊथची सुपरस्टार साई पल्लवीची (सीता) जोडी पाहायला मिळणार आहे. 'रामायण' चित्रपटात साऊथ अभिनेता यश रावणाची भूमिका साकारणार आहे. तर सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे.

'रामायण' चित्रपटात लोकप्रिय मराठी अभिनेत्याची वर्णी लागली आहे. जो 'भरत' ची भूमिका साकारणार आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) आहे. आदिनाथने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत आदिनाथने आपल्या भूमिकेबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. तो नेमकं काय म्हणाला जाणून घेऊयात.

आदिनाथ मुलाखतीत म्हणाला की, "'रामायण' चित्रपटात 'भरत' ची भूमिका मिळणं माझ्यासाठी आशीर्वाद आहे. 'रामायण' हा भारतातील सर्वात मोठा चित्रपट आहे. हा चित्रपट भव्यतेसाठी ओळखला जातो. त्यामुळे चित्रपटाचा भाग होणे माझ्यासाठी एक मोठी जबाबदारी आहे.मुकेश छाब्रा, नमित मल्होत्रा आणि नितेश तिवारी यांचे मनापासून आभार की त्यांनी मला 'भरत' या भूमिकेसाठी निवडले. "

पुढे आदिनाथ म्हणाला की, "नितेश तिवारी आणि नमित मल्होत्रा यांनी चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शनवर तब्बल 10 वर्षे मेहनत केली आहे. मी चित्रपटाची कथा ऐकताच थक्क झालो. चित्रपटात व्हीएफएक्स, निर्मिती आणि सादरीकरण खूप दर्जेदार आहे. मी भाग्यवान आहे की या चित्रपटाचा भाग आहे. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो की इतक्या मोठ्या चित्रपटात काम करण्याची संधी मला मिळाली."

Adinath Kothare In Ramayana Movie
Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरनं बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत 'सैयारा' पाहिला, थिएटरमधला 'तो' VIDEO व्हायरल
Q

'रामायण' चित्रपट कधी रिलीज होणार?

A

'रामायण' चित्रपटाचा पहिला भाग - दिवाळी 2026

Q

'रामायण' चित्रपटात भरतची भूमिका कोण साकारणार?

A

आदिनाथ कोठारे

Q

'रामायण' चित्रपटात मुख्य भूमिकेत कोण?

A

रणबीर कपूर- प्रभु श्री राम

साई पल्लवी - सीता माता

Q

'रामायण' चित्रपटात रावणाची भूमिका कोण साकारणार?

A

साऊथ अभिनेता यश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com