Shreya Maskar
धोंडस हा एक पारंपरिक मालवणी गोड पदार्थ आहे.
धोंडस बनवण्यासाठी किसलेली काकडी, रवा, गूळ, भाजलेले शेंगदाणे, ओल्या नारळाचा किस, मीठ, वेलची पावडर, तूप आणि काजू इत्यादी साहित्य लागते.
धोंडस बनवण्यासाठी सर्वप्रथम काकडी किसून घ्या.
पॅनमध्ये तूप टाकून रव्याला भाजून घ्या.
आता यात गूळ, शेंगदाणे, नारळाचा किस आणि मीठ मिक्स करा.
मिश्रण छान एकजीव झाले की त्यात काजू आणि वेलची पावडर टाका.
शेवटी या मिश्रणात गरम पाणी आणि किसलेली काकडी मिक्स करून छान ढवळून घ्या.
शेवटी मिश्रण थंड झाल्यावर त्याला वडीचा आकार द्या.