Shreya Maskar
शेवग्याच्या शेंगांची आमटी बनवण्यासाठी तूर डाळ, शेवग्याच्या शेंगाचे तुकडे, किसलेला नारळ, हिरव्या मिरच्या, मोहरी, जिरे, हिंग, हळद, तेल, कढीपत्ता, गूळ, आमसूल, गोडा मसाला आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
शेवग्याच्या शेंगांची आमटी बनवण्यासाठी सर्वप्रथम कुकरमध्ये तूर डाळ शिजवून घ्या.
त्यानंतर शेवग्याच्या शेंगा मीठ घालून शिजवून घ्या.
आता एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, किसेलेलं खोबरं टाकून फोडणी तयार करा.
फोडणी चांगली तडतडली की, त्यात उकडलेली डाळ घाला.
आमटीला एक उकळी आल्यावर त्यात शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा टाका.
त्यानंतर या मिश्रणात गोडा मसाला, आमसूल आणि मीठ टाकून एक उकळी काढा.
शेवटी शेवग्याच्या शेंगांची आमटीवर कोथिंबीर भुरभुरून आमटीचा भातासोबत आस्वाद घ्या.