Yuzvendra Chahal Viral Chat: युजवेंद्र चहलनं अभिनेत्रीला केला होता मेसेज, तिने ऑन कॅमेरा दाखवले चॅट्स, VIDEO व्हायरल

Yuzvendra Chahal Viral Chat: युजवेंद्र चहल आणि या अभिनेत्रीचे इंस्टाग्राम चॅट व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीने ऑन कॅमेरा मेसेज दाखवल्याने सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
Yuzvendra Chahal Viral Chat
Yuzvendra Chahal Viral ChatSaam Tv
Published On

Yuzvendra Chahal Chats Viral: भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, यावेळी कारण ठरले आहे त्याचे एक कथित सोशल मीडिया चॅट. ‘गंदी बात’ या वेब सीरिजमधून ओळख मिळवलेली अभिनेत्री तान्या चॅटर्जी हिने चहलसोबतचा एक इंस्टाग्राम मेसेज पापाराझीं समोर शेअर केल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तानिया चॅटर्जीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती कॅमेऱ्यासमोर तिच्या मोबाईलमधील चॅट दाखवताना दिसते. या चॅटमध्ये चहलने तिला 'क्यूट' असा पर्सनल मेसेज केला आहे.

Yuzvendra Chahal Viral Chat
Asha Bhosle Passes Away: सुरांचा अमूल्य ठेवा हरपला; ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड

तानियाने सांगितले की, तिला हा मेसेज पाहायला उशीर झाला म्हणून त्यावर विशेष प्रतिक्रिया दिली नाही. विशेष म्हणजे, ती चहलला वैयक्तिकरित्या ओळखत नसल्यामुळे हा मेसेज तिच्यासाठी आश्चर्यकारक आहे असे तिने पॅप्सना सांगितले.

Yuzvendra Chahal Viral Chat
Actress Trolled: आशा भोसले यांचं निधन, पण आदरांजली लता मंगेशकरांना; प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीकडून मोठी चूक

तान्या चॅटर्जीचा हा व्हिडीओ समोर आल्यावर सोशल मीडियावर विविध कमेंट येत आहेत. काही नेटकरी याला नॉर्मल बोलत आहेत. तर अनेकांनी याला चुकीचे ठरवत चहलला ट्रोल केले आहे. काहींनी तर तान्या चटर्जीवर पब्लिसिटी स्टंट करत असल्याचा आरोप केला आहे.

सध्या आयपीएल 2026 स्पर्धा सुरू असताना हा वाद समोर आल्यामुळे क्रिकेट आणि मनोरंजन क्षेत्रातही याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वीही चहलच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी चर्चेत आल्या होत्या, त्यामुळे या नव्या प्रकरणाने पुन्हा एकदा त्याच्यावर लक्ष केंद्रित झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com