Vivek Oberoi : विवेक ओबेरॉयने शाहरुख खानचा 'ओम शांती ओम' का नाकारला? १७ वर्षांनंतर केला खुलासा

Vivek Oberoi : विवेक ओबेरॉयने आपल्या करिअरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे. अलीकडेच अभिनेत्याने खुलासा केला की त्याने शाहरुख खानचा चित्रपट ओम शांती ओम का नाकारला होता.
shahrukh khan and vivek Oberoi
shahrukh khan and vivek OberoiGoogle
Published On

Vivek Oberoi : अभिनेता विवेक ओबेरॉय आता क्वचितच चित्रपटांमध्ये दिसत असेल, पण एक काळ असा होता जेव्हा त्याच्या चाहत्यांना त्याचे वेड होते आणि त्याच्याकडेही चित्रपटांची रांग लागली होती. पण काळ बदलला आणि परिस्थिती बदलत राहिली. त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे, परंतु त्याने 'हम तुम' आणि 'ओम शांती ओम'चा भाग होण्यास नकार दिला.अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान स्वतः विवेक ओबेरॉयने खुलासा केला की, त्याने शाहरुख खानचा 'ओम शांती ओम' चित्रपट का नाकारला.

एका मुलाखतीत बोलताना विवेक ओबेरॉय म्हणाला की, त्याच्याकडे दोन पर्याय होते, एकतर तो 'ओम शांती ओम' किंवा 'शूटआउट ॲट लोखंडवाला' निवडू शकतो, कारण तारखेचा गोंधळ होता. या दोन्ही चित्रपटात त्याला नकारात्मक भूमिका करायच्या होत्या. अपूर्व लखियाचा ॲक्शन-थ्रिलर निवडण्यामागच्या कारणाबद्दल, त्याने सांगितले की, सर्वात आधी त्याला शूटआउटमधील त्याची भूमिका आवडली. दुसरी गोष्ट म्हणजे फराह खानने 'ओम शांती ओम'साठी त्याच्याशी संपर्क साधला तोपर्यंत त्याने शूटआउटमधील त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल पूर्णपणे संशोधन केले होते.

shahrukh khan and vivek Oberoi
Salman Khan : सलमान खानला का मारलं होत घरातल्या शेफने आणि वडीलांनी; कारण वाचून खूप हसाल

विवेकने ओम शांती ओम का नाही म्हटले?

विवेक ओबेरॉय म्हणाला, “ शूटआउटमधील व्यक्तिरेखेसाठी पोलिसांना भेटलो, मी गुन्ह्यांच्या फाईल्स वाचल्या आणि माझ्या व्यक्तिरेखेची कल्पना करायला सुरुवात केली. मी माझ्या भूमिकेसाठी ४-५ महिने आधीच तयारी केली होती. त्या वेळी, गीअर्स बदलणे आणि सूट आणि बूट परिधान केलेल्या इतर भूमिकेशी जुळवून घेणे थोडे कठीण होते.” विवेक ओबेरॉय पुढे म्हणाले की, जर परिस्थिती वेगळी असती तर त्याने शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या ॲक्शन ड्रामा चित्रपटासाठी नक्कीच हो म्हटलं असतं.

shahrukh khan and vivek Oberoi
Jaya Bhattacharya : जया भट्टाचार्यने कुत्र्याच्या लहान पिल्लाचे वाचवले प्राण; लैंगिक अत्याचारापासून केला बचाव

जेव्हा मला शाहरुख खानसोबत शूट करण्याची संधी मिळाली

फराह खानच्या चित्रपटाचे वर्णन करताना विवेक ओबेरॉय म्हणाला, “माझ्या कारकिर्दीसाठी शाहरुख खानसोबत काम करणे खूपच छान आहे. माझ्या करिअरमध्ये मला शाहरुख खानसोबत 'साथिया' या चित्रपटात काही रात्री शूट करण्याची संधी मिळाली. साथियामध्ये शाहरुख खान पाहुण्यांच्या भूमिकेत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com