
Salman Khan : बॉलीवूडचा भाईजान सलमान खान हा चाहत्यांच्या आवडत्या स्टार्सपैकी एक आहे. त्याचे चाहते सलमानवर सतत प्रेमाचा वर्षाव करत आहेत. भाईजानचा वाढदिवस २७ डिसेंबरला असून या दिवशी तो ५९ वर्षांचा होणार आहे. दबंग खानचे चाहते या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण सलमान त्याच्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी चाहत्यांना भेटण्यासाठी बाल्कनीत येतो. सलमान खानने आपल्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्याच्या चाहत्यांना त्याच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक छोट्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. आज आम्ही तुम्हाला सलमानच्या आयुष्यातील एक घटना सांगणार आहोत, जी खूपच गंमतीशीर आहे आणि ज्यामुळे सलमानला त्याच्या घरच्या शेफने आणि वडील सलीम खान यांनी धोपटले होते.
जेव्हा सलमान खानला शेफने मारले
सलमान खान एकदा करण जोहरच्या चॅट शोमध्ये आला होता, जिथे त्याने आपल्या खोडसाळपणाचा खुलासा केला होता. सलमान खानने सांगितले होते की, “ मी लहान असताना खूप खोडकर होतो. त्यावेळी आमच्या घरात नवीन पेंटिंगचे काम झाले होते. त्या वेळी आम्ही ब्रूस ली पाहायचो आणि आम्हाला ब्रूस लीसारखे लढायला खूप आवडते. त्यामुळे आम्ही घराच्या भिंतींशी ब्रूस ली खेळू लागलो. पेंट नवीन होता हेही आम्हाला आठवत नव्हते. आमच्या खेळामुळे भिंतीवर वेगळी विचित्र अशी नक्षी तयार झाली.
वडिलांनीही त्याला बेदम मारले
सलमान खान पुढे म्हणाला, “आमची ही कुचराई पाहून घरच्या शेफला खूप राग आला आणि मग त्याने आम्हाला बेदम मारहाण केली. आचाऱ्याने आम्हाला मारहाण केल्याचे आम्ही पापा यांना सांगितल्यावर त्यांनी शेफला असे का केले असे विचारले. यावर आचाऱ्याने आमची सर्व हकिगत वडिलांना सांगितली. यानंतर वडिलांनीही आम्हाला फाटकावले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.