Jackky Bhagnani Birthday : फ्लॉप चित्रपट देऊनही 'जॅकी भगनानी' आहे कोट्यवधींचा मालक, संपत्तीचा आकडा ऐकून डोळे भिरभिरतील

Jackky Bhagnani Net Worth : आज बॉलिवूड अभिनेता 'जॅकी भगनानी'चा ४०वा वाढदिवस आहे. आजवर त्याने अनेक फ्लॉप चित्रपट दिले आहेत. वाढदिवसानिमित्त जॅकी भगनानी किती कोटींचा मालक आहे, जाणून घेऊयात.
Jackky Bhagnani Net Worth
Jackky Bhagnani BirthdaySAAM TV
Published On

बॉलिवूड अभिनेता जॅकी भगनानी ( Jackky Bhagnani) कायमच त्याच्या कूल स्टायलिंगसाठी ओळखला जातो. जॅकीने खूप कमी चित्रपट केले आहेत. त्याचे अनेक चाहते आहेत. तरुणांमध्ये जॅकीची क्रेझ पाहायला मिळते. जॅकी भगनानी 2024 च्या फेब्रुवारी महिन्यात बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगसोबत लग्नगाठ बांधली. जॅकी आणि रकुल खूप वेळेपासून एकमेकांना डेट करत होते.

जॅकी भगनानी मालमत्ता किती?

जॅकी भगनानीने अभिनयासोबत चित्रपट प्रोड्युसही केले आहेत. यातून तो कोट्यवधींची कमाई करतो. जॅकी भगनानी निर्माता वासू भगनानी यांचा मुलगा आहे. जॅकी भगनानी 2009 मध्ये 'कल किसने देखा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याचा हा चित्रपट फ्लॉप ठरला. त्यानंतर कालांतराने तो निर्माती क्षेत्राकडे वळाला. जॅकी भगनानी निर्माती क्षेत्रातून करोडो रुपये कमावतो.

मीडिया रिपोर्टनुसार, जॅकी भगनानी एकूण 41 कोटींचा मालक आहे. तो महिन्याला 20 लाख रुपये कमवतो. तसेच त्याचे वार्षिक उत्पन्न सुमारे 3 कोटी आहे. तर रकुल प्रीत सिंग 49 कोटींची मालकीण आहे. आजवरचे जॅकीचे केलेले सर्व चित्रपट फ्लॉप ठरले. तरीही जॅकी भगनानी आता लग्जरी लाइफ जगत आहे. जॅकी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. त्याचे इंस्टाग्रामवर 3.2 मिलियन फॉलोवर्स आहेत.

रकुल प्रीत आणि जॅकीने शीख पद्धतीने लग्न केले. रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघेही एकमेकांचे शेजारी होते. लॉकडाऊन दरम्यान त्यांच्यात छान मैत्री झाली. 2021मध्ये या दोघांनी आपले सुंदर नाते अधिकृत रित्या जाहीर केले. त्यांच्याकडे अनेक लग्जरी कार आहेत आणि आलिशान घर आहे. रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी बॉलिवूडचे पावर कपल आहे.

Jackky Bhagnani Net Worth
Pushpa 2 Collection : 'झुकेगा नही साला...' पुष्पा भाऊची क्रेझ कायम, तिसऱ्या मंगळवारी कमावले 'इतके' कोटी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com