Veen Doghantli Hi Tutena: स्वानंदी आणि समरच्या आयुष्यात येणार चिमुकला पाहुणा? 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत मोठा ट्विस्ट

Veen Doghantli Hi Tutena: वीण दोघांतली ही तुटेना मालिकेत स्वानंदीच्या हातात दिसली प्रेग्नन्सी टेस्ट किट. समरला मिळणार गुड न्यूज? झी मराठीच्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.
Veen Doghantli Hi Tutena
Veen Doghantli Hi TutenaSaam Tv
Published On: 

Veen Doghantli Hi Tutena: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक असलेल्या 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत सध्या रंजक वळण पाहायला मिळत आहे. समर आणि स्वानंदी यांच्या नात्यात सुरुवातीला अनेक चढ-उतार आले. परिस्थितीमुळे त्यांचे लग्न झाले होते. मात्र, हळूहळू दोघांमध्ये मैत्री आणि या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आता दोघेही एकमेकांच्या सुख-दुःखात खंबीरपणे साथ देताना दिसतात. अशातच मालिकेचा नवा प्रोमो समोर आला असून समर आणि स्वानंदीच्या आयुष्यात लवकरच एका नव्या पाहुण्याचे आगमन होणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

स्वानंदी-समर आई-बाबा होणार?

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये समर खोलीत येतो. त्यावेळी स्वानंदी काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत असते. तिच्या हातात नेमके काय आहे, हे पाहण्यासाठी समर तिच्या मागे जातो. दोघांची धावपळ सुरू असतानाच स्वानंदीच्या हातातील प्रेग्नन्सी टेस्ट किट खाली पडते. हे पाहून समरला आश्चर्याचा धक्का बसतो. तो आनंदाने स्वानंदीला विचारतो, "प्रेग्नन्सी टेस्ट किट? आपल्याला बाळ होणार?" यावर स्वानंदी म्हणते, "असं वाटतंय, आधी टेस्ट करून बघू." त्यानंतर ती प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठी जाते.

Veen Doghantli Hi Tutena
Famous Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, अल्झायमरशी झुंज ठरली अपयशी; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

समरच्या मनात वाढली उत्सुकता

स्वानंदी टेस्ट करण्यासाठी गेल्यानंतर समरची उत्सुकता आणखी वाढते. तो खोलीत इकडे तिकडे फेऱ्या मारताना दिसतो. स्वानंदी टेस्टचा निकाल काय सांगणार, याची त्याला प्रचंड उत्सुकता असते. त्यामुळे मालिकेच्या आगामी भागात समर आणि स्वानंदीला खरोखरच आनंदाची बातमी मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Veen Doghantli Hi Tutena
Shivali Parab: अमेरिकेत पोहोचली शिवाली परब! गुलाबी फ्लोरल ड्रेसमधील सुंदर फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

प्रोमो पाहून चाहतेही उत्सुक

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने 'स्वानंदी देणार समरला गुड न्यूज' अशी कॅप्शन दिली आहे. प्रोमो समोर येताच चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'खूप उत्सुक आहे', 'आशा आहे की समर आणि स्वानंदीला आनंदाची बातमी मिळेल', 'कुणीतरी येणार गं', अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. आता स्वानंदीची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येणार की मालिकेत आणखी नवे वळण पाहायला मिळणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.