Shruti Vilas Kadam
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री शिवाली परब सध्या तिच्या खास फोटोंमुळे चर्चेत आली आहे. तिच्या सुंदर अंदाजाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
शिवाली सध्या अमेरिकेत कामानिमित्ताने गेली आहे. तिथल्या निसर्गरम्य ठिकाणी ती फिरण्याचा आनंद घेत आहे. या ट्रिपमधील काही खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये शिवालीने गुलाबी रंगाचा फ्लोरल प्रिंटेड वनपीस ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये तिचा लूक अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसत आहे.
थंडीच्या वातावरणाचा विचार करून शिवालीने गुलाबी ड्रेससोबत काळ्या रंगाचे स्टॉकिंग्स आणि स्टायलिश बूट्स घातले आहेत. तिची ही फॅशन स्टाईल चाहत्यांना आवडत आहे.
शिवालीने अमेरिकेतील एका सुंदर बागेत फोटोशूट केले आहे. निळ्या बाकावर बसून हातात झाडाचे पान घेतलेली तिची पोझ विशेष लक्ष वेधून घेत आहे.
शिवालीचा हा लूक फारसा भडक नसून अगदी साधा आणि नॅचरल आहे. गुलाबी ड्रेस, काळे बूट आणि तिचे गोड हसू यामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.
शिवालीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. तिच्या या क्यूट आणि स्टायलिश लूकची चाहते प्रशंसा करत आहेत. तिच्या अमेरिकेतील ट्रिपमधील फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.