Diabetes Causes: साखर नाही, गोड पण खात नाही, तरीही तुमच्या रक्तातील साखर वाढते? डॉक्टरांनी सांगितले धक्कादायक कारण

Shruti Vilas Kadam

सकाळी रक्तातील साखर वाढणे

काही लोकांची सकाळी उठल्यानंतर रक्तातील साखर वाढलेली असते. याला डॉन फेनॉमेनन म्हणतात. पहाटे शरीरात काही हार्मोन्स वाढतात. त्यामुळे लिव्हरमधून रक्तात साखर सोडली जाते आणि ब्लड शुगर वाढू शकते.

Diabetes | pinterest

मानसिक ताण आणि चिंता

जास्त ताण घेणे, चिंता करणे किंवा सतत विचार करत राहणे याचाही रक्तातील साखरेवर परिणाम होतो. तणावामुळे शरीरात काही हार्मोन्स वाढतात. त्यामुळे रक्तातील साखरे वाढू शकते.

Diabetes | pinterest

आजारपण

सर्दी, ताप किंवा शरीरात कोणताही संसर्ग झाल्यास रक्तातील साखर वाढू शकते. आजारपणात शरीरात काही बदल होतात. त्यामुळे इन्सुलिन योग्य प्रकारे काम करत नाही.

Diabetes Causes | saam tv

जास्तच व्यायाम करणे

व्यायाम करणे आरोग्यासाठी चांगले असते. मात्र, खूप जास्त व्यायाम केल्यास काही वेळासाठी रक्तातील साखर वाढू शकते. कारण अशावेळी शरीरातून काही हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.

gym | yandex

शरीरात पाण्याची कमतरता असणे

दिवसभर पुरेसे पाणी न प्यायल्यास शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे दिवसभर योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे.

water | pinterest

काही औषधांचा परिणाम

काही औषधांमुळे रक्तातील साखर वाढू शकते. विशेषतः स्टेरॉइड्स असलेल्या औषधांचा यावर परिणाम होतो. त्यामुळे औषधे घेतल्यानंतर साखरेची पातळी वाढत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Diabetes Causes | pintrest

शरीरातील हार्मोन्समध्ये बदल

शरीरातील हार्मोन्समध्ये बदल झाल्यामुळेही रक्तातील साखरेची पातळी बदलू शकते. विशेषतः महिलांमध्ये मासिक पाळीच्या आधी किंवा दरम्यान हार्मोन्समध्ये बदल होतात. त्यामुळे काही महिलांची रक्तातील साखर वाढू शकते.

Diabetes | pinterest

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Diabetes Causes | pinterest

Zumba vs Walking: झुंबा की वॉकिंग? वजन कमी करण्यासाठी काय आहे अधिक फायदेशीर?

Zumba vs Walking | Saam tv
येथे क्लिक करा