Zumba vs Walking: झुंबा की वॉकिंग? वजन कमी करण्यासाठी काय आहे अधिक फायदेशीर?

Shruti Vilas Kadam

झुंबामध्ये जास्त कॅलरी बर्न होतात

झुंबा हा एरोबिक व्यायाम असल्याने शरीराची हालचाल अधिक होते आणि कमी वेळेत तुलनेने जास्त कॅलरी खर्च होऊ शकतात.

Zumba Dance | Saam Tv

वॉकिंग सोपे आणि सुरक्षित

दररोज 30–45 मिनिटे वेगाने चालणे हा सुरुवातीला वजन कमी करण्यासाठी सोपा आणि सातत्य वाढवणारा महत्वाचा व्यायाम आहे.

Walk | pinterest

झुंबामुळे संपूर्ण शरीराची हालचाल होते

डान्सच्या हालचालींमुळे हात, पाय, कंबर आणि कोअर यांचा व्यायाम होतो. त्यामुळे फिटनेससोबत स्टॅमिनाही सुधारण्यास मदत होते.

Zumba | Saam Tv

वॉकिंग सातत्याने करता येते

वॉकिंगसाठी विशेष उपकरणांची गरज नसते. त्यामुळे रोजच्या रुटीनमध्ये सहज वॉक करता येते आणि यामुळे सातत्य वाढते.

to walk | pinterest

मूड आणि मोटिव्हेशनसाठी झुंबा फायदेशीर

गाण्यावर डान्स करत व्यायाम केल्यामुळे झुंबा कंटाळवाणा वाटत नाही आणि नियमित व्यायामाची सवय लागण्यास मदत होऊ शकते.

Zumba Dance | Saam Tv

वजन कमी करण्यासाठी डाएटही महत्त्वाचा

फक्त झुंबा किंवा वॉकिंग करून वजन कमी होईलच असे नाही. कॅलरी संतुलन, पौष्टिक आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम यासगळ्याने वजन कमी होते.

Healthy Foods | Canva

दोन्हीचा कॉम्बिनेशन उत्तम पर्याय

वजन कमी करण्यासाठी आठवड्यात काही दिवस 20–30 मिनिटे झुंबा आणि इतर दिवशी 30–45 मिनिटे वॉक केल्यास शरिर फास्ट कॅलरी बर्न करेल.

Zumba vs Walking | Saam tv

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Zumba vs Walking

Boondi Laddu Recipe: दिवाळीला फराळात बनवा स्वादिष्ट दाणेदार बूंदीचे लाडू, वाचा सोपी रेसिपी

Boondi Laddu Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा