Veen Doghantali Hi Tutena : घट्ट मिठी, गालावर किस; समर-स्वानंदीच्या नात्यात रोमँटिक केमिस्ट्री सुरू, पाहा VIDEO

Veen Doghantali Hi Tutena Marathi Serial Update : समर-स्वानंदीच्या आयुष्यात सध्या प्रेमाचा वर्षाव होताना दिसत आहे. नुकताच 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेचा एक रोमँटिक प्रोमो समोर आला आहे.
Veen Doghantali Hi Tutena Marathi Serial Update
Veen Doghantali Hi TutenaSAAM TV
Published On
Summary

स्वानंदीने शोधलं आजीच्या किडनॅपिंगचे सत्य

समर - स्वानंदीच्या रोमँटिक केमिस्ट्रीला सुरुवात

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेचा नवीन प्रोमो चर्चेत

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत रोज नवा ड्रामा पाहायला मिळतो. समरची आजी किडनॅप होते. त्यानंतर समर २५ लाख रुपये देऊन आजीला सोडवून घरी घेऊन येतो. आजी सुखरूप घरी आल्यावर स्वानंदी आजीला नेमकं कोणी किडनॅप केले, याचा शोध घ्यायला सुरुवात करते. तेव्हा तिला मल्लिका काकू आणि अंशुमनवर संशय येतो आणि तिला तसे पुरावे देखील मिळतात. आता मल्लिका काकू आणि अंशुमनचे कारस्थान स्वानंदी समर आणि आजीसमोर घेऊन येणार आहे. अशात 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे.

प्रोमोमध्ये नेमकं काय?

'वीण दोघांतली ही तुटेना'च्या नवीन प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्वानंदी आणि समर आपल्या रुममध्ये क्यूट रोमान्स करत असतात. समर स्वानंदीला जवळ घेतो. तेव्हा स्वानंदी बोलते की, "मी कशी तुम्हाला अहो, राजवाडे असं म्हणते... तस तुम्हीही स्वानंदी एवढंच म्हणाना मला... " त्यावर रोमँटिक अंदाजात समर स्वानंदीला 'स्वानंदी' अशी हाक मरतो. त्यानंतर आनंदाने स्वानंदी समरच्या गालावर किस करते आणि लाजून त्याच्यापासून दूर जाते. त्यानंतर समरची विकेट पडते. त्यानंतर समर आपल्या दुसऱ्या गालावर बोट ठेवत बोलतो की, हा ना ऑलरेडी दुखावला गेला आहे...याला आणि याला अन्याय असं कसं..." त्यानंतर स्वानंदी लाजून समरला घट्ट मिठी मारते.

'वीण दोघांतली ही तुटेना' च्या प्रोमोला "समर-स्वानंदीच्या नात्याची रोमँटिक केमिस्ट्री सुरू होणार!" असे कॅप्शन देण्यात आले आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका संध्याकाळी 7:30 वाजता पाहायला मिळते. या मालिकेला प्रेक्षकांकडून भरपूर चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरे अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे. त्यांच्या केमिस्ट्रीची चर्चा पाहायला मिळत आहे.

Veen Doghantali Hi Tutena Marathi Serial Update
Veen Doghantali Hi Tutena : आजीच्या किडनॅपिंगचे रहस्य उलगडणार, स्वानंदीच्या हाती लागलेला 'तो' पुरावा पाहून मल्लिका काकू अन् अंशुमनची बोलती बंद | VIDEO

स्वानंदीला मिळतो मोठा पुरावा

स्वानंदीला समजते की, अंशुमन बाहेर लाखांमध्ये देण लागत आहे. तर आजीला ज्या रिक्षातून घेऊन जातात. त्यात स्वानंदीला मल्लिका काकूचा कानातला मिळतो. जेव्हा हे सर्व स्वानंदी त्यांच्यासमोर उघड करते. तेव्हा अंशुमन आणि मल्लिका काकूचा चेहरा पडतो आणि मालिकेत पुढे काय होणार? समर-स्वानंदीचे नाते कोणते वळण घेणार हे सर्वच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com