Veen Doghantali Hi Tutena : आजीच्या किडनॅपिंगचे रहस्य उलगडणार, स्वानंदीच्या हाती लागलेला 'तो' पुरावा पाहून मल्लिका काकू अन् अंशुमनची बोलती बंद | VIDEO

Veen Doghantali Hi Tutena Marathi Serial Update : 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत आजीचे किडनॅपिंग होते, ज्यामुळे समर आणि स्वानंदीवर मोठे संकट येते. स्वानंदीला अपहरण करणाऱ्या व्यक्तीबद्दल मोठा पुरावा मिळाला आहे.
Veen Doghantali Hi Tutena Marathi Serial Update
Veen Doghantali Hi TutenaSAAM TV
Published On
Summary

समरच्या आजीचे अपहरण

समर-स्वानंदीला खंडणीसाठी येतो फोन

स्वानंदी घेणार किडनॅपरचा शोध

'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत समरच्या आजीचे अपहरण होते. ज्यामुळे समर-स्वानंदीवर मोठे संकट येते. किडनॅपर खंडणीसाठी समरला फोन करतात आणि तब्बल २५ लाखांची मागणी करतात. समर पैसे देऊन आजीला घरी घेऊन येतो. मात्र स्वानंदीला या सर्वात काहीतरी गडबड वाटते आणि ती सर्वाचा शोध घ्यायला लागते. स्वानंदीला सुरुवातीपासून मल्लिका आणि अंशुमनवर संशय असतो. अशात स्वानंदीला एक गोष्ट मिळतो, ज्यामुळे तो संशय खरा ठरतो. नुकताच मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे.

व्हिडीओत नेमकं काय?

स्वानंदी सर्वांसमोर बोलते की, "ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की अंशुमन कोणाचं तरी इतकं मोठं खूप लाखांमध्ये देण लागत असताना अचानकच आपल्या आजी किडनॅप होतात..." त्यावर अंशुमन बोलतो की, "काय म्हणायचे आहे तुला, मी किडनॅप केलं आजीला? " त्यावर होकार देत स्वानंदी बोलते की, "हो! आणि फक्त तू नाही... तू आणि काकूंनी दोघांनी मिळून केलं आहे..."

स्वानंदीला मिळतो मोठा पुरावा

स्वानंदीला एक अंगठी मिळते जी मल्लिका काकूची असते. स्वानंदीला ती अंगठी आजीला किडनॅप केलेल्या रिक्षामध्ये मिळते. स्वानंदी हा पुरावा समर आणि आजीसमोर मल्लिकाला दाखवते. जे पाहून मल्लिका आणि अंशुमनच्या चेहऱ्याचा रंग उडतो. अंशुमनचे कर्ज फेडण्यासाठी मल्लिका आणि अंशुमन मिळून आजीला किडनॅप करतात आणि समरकडून पैसे (२५ लाख) उकळतात. आता हे सत्य समोर आल्यावर समर नेमकं काय करणार पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Veen Doghantali Hi Tutena Marathi Serial Update
Famous Actor Divorce : २० वर्षांच्या संसारानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट? अखेर त्याने सोडले मौन, म्हणाला...

तसेच अंशुमन आणि मल्लिका आपला गुन्हा कबुल करणार की स्वानंदीला खोटं पाडणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका रोज संध्याकाळी ७.३० वाजता 'झी मराठी' वाहिनीवर पाहायला मिळते. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "स्वानंदी तिचं म्हणणं पुराव्यांसकट पटवून देऊ शकेल? " 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेचे येणार भाग खूपच भन्नाट असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com